Last Updated on 27 Sep 2024 10:04 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा पंचायत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची बदली झाली आहे. वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून आर. बी. पांढरे यांची नव्याने नियुक्ती झालेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अवर सचिव डॉ. शर्मिला जोशी यांनी हे बदलीचे आदेश काढले. सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने हे आदेश काढण्यात आलेले आहेत.
डॉ. पवार यांची वाळवा पंचायत पंचायत समिती येथून माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. डॉ. यांचे पशु वैद्यकीय शास्त्रात एम.व्ही.एस.सी. (M.V.Sc.) शिक्षण झालेले आहे. २००१ च्या बॅचमधील एमपीएससी मधून निवड झालेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, शाहूवाडी, कागल, सातारा जिल्ह्यातील कराड आणि वाळवा येथे गटविकास अधिकारी या पदावर कामकाज केलेले आहे.येथे असताना त्यांच्या कार्यकाळात पर्यावरण संवर्धन, भरारी प्रकल्प शिक्षण विभाग, वृक्षलागवड किमान १ लाख, गुणवत्ता पुर्ण शाळा, जलतारा/जलव्यवस्थापन, पाणंद रस्ते, स्वयंपुर्ण व समृद्ध गाव, शेतकरी समृद्ध केळी लागवड द्राक्ष लागवड, बचत गट कर्ज पुरवठा, महीला सक्षमीकरण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, नावीन्य पुर्ण शाश्वत विकास आदी महत्वपूर्ण कामे झाली आहेत.
वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून आर. बी. पांढरे यांची नव्याने नियुक्ती झालेली आहे. पांढरे हे मेहकर (जि. बुलडाणा) येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. तेथून त्यांची इस्लामपूर येथे बदली झाली आहे.









































































