Last Updated on 19 Jul 2021 4:35 PM by
शेतकरी यांच्यासाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतीनं अर्ज करू शकतात.
नवी दिल्ली : PM Kisan Tractor Yojana: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारकडून शेतकर्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. शेतकर्यांना शेतीच्या कामासाठी अनेक प्रकारच्या मशीनचीही गरज आहे. या गरजेमध्ये ट्रॅक्टर हा शेतकर्यांच्या गरजेचा भाग आहे. शेतकरी नांगरणे आणि लावणी वगैरे कामे ट्रॅक्टरद्वारे करतात. भारतात असे बरेच शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक अडचणींमुळे ट्रॅक्टर नाही.
शेतात कामासाठी ते ट्रॅक्टर भाड्याने देतात किंवा बैलांचा वापर करतात
अशा परिस्थितीत ते शेतात कामासाठी ट्रॅक्टर भाड्याने देतात किंवा बैलांचा वापर करतात. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देण्याची योजना सुरू केलीय. ही योजना पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना म्हणून ओळखली जाते.
50 टक्के अनुदान उपलब्ध
केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देते. यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात आणि तेही निम्म्या किमतीत. उर्वरित अर्धे पैसे अनुदान म्हणून सरकारकडून दिले जातात. अनेक राज्य सरकार आपापल्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर 20 ते 50 टक्के अनुदान देते.
PM Kisan Tractor Scheme चे नियम व अटी-
– मागील 7 वर्षांत ट्रॅक्टर खरेदी केला नसलेले शेतकरीच या योजनेत नोंदणी करू शकतात.
– महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी या अर्जदार शेतकऱ्याकडे शेती योग्य जमीन असणं गरजेचं आहे.
– एका शेतकऱ्याला केवळ एकच ट्रॅक्टर खरेदी करता येईल.
– योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला दुसऱ्या कृषी यंत्र अनुदान योजनेचा लाभ घेता येणार नाही.
– कुटुंबातील फक्त एकच सदस्यावा अर्ज करता येईल.
– मोठ्या जमीनदार शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
PM Kisan Tractor Scheme साठी आवश्यक कागदपत्रे
– अर्जदार शेतकऱ्याचं आधार कार्ड
– अर्जदार शेतकऱ्याचा पासपोर्ट साईज फोटो
– शेतीची सातबारा आणि आठ ‘अ’ उतारा
– अर्जदार शेतकऱ्याचं ओळखपत्र, मतदान कार्ड, पॅन कार्ड
– अर्जदाराचे बँक अकाउंट पासबुक
– अर्जदाराचा मोबाईल नंबर
PM Kisan Tractor Scheme या योजनेचा अर्ज कसा करावा
-योजनेचा लाभ देशातील सर्व छोटे शेतकरी घेऊ शकतात. त्या त्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नियमानुसार अर्ज करावा लागेल.
-या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवा ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणांवर अनुदानाचा लाभ थेट त्यांच्या खात्यावर जमा केला जातो.
-शेतकरी यांच्यासाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन या दोन्ही पद्धतीनं अर्ज करू शकतात.
– शेतकऱ्यांनी जवळच्या कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन डिजिटल सेवेच्या माध्यमातून या योजनेचा फायदा घेऊ शकतात.














































































