Last Updated on 12 Dec 2021 1:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
Updated : 12 DEC 2021 9:12AM
नवी दिल्ली |
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 132.93 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 92,281; गेल्या 560 दिवसातील सर्वात कमी संख्या
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 1 टक्केपेक्षाही कमी, सध्या हे प्रमाण 0.27 टक्के; मार्च 2020 पासून सर्वात कमी
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.36 टक्के; मार्च 2020 पासून सर्वाधिक
गेल्या 24 तासात 8,464 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून एकूण 3,41,22,795 वर
गेल्या 24 तासात 7,774 नवे रुग्ण
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.65 टक्के) गेल्या 69 दिवसांपासून 2 टक्केपेक्षा कमी
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.70 टक्के) गेल्या 28 दिवसांपासून 1 टक्केपेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 65.58 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
गेल्या 24 तासांत 8,464 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,41,22,795 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.36% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वाधिक दर आहे.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 92,281 आहे. गेल्या 560 दिवसातील ही सर्वात कमी संख्या आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.27% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 11,89,459 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 65.58 (65,58,16,759) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.70% असून गेल्या 28 दिवसांपासून हा दर 1% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.65% असून गेले 69 दिवस हा दर 2% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 104 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.















































































