Last Updated on 30 Sep 2021 6:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महापालिका शाळेतील पाच व खासगी अनुदानित चार शिक्षकांना पुरस्कार
सहाय्यक शिक्षिका कविता रविकिरण सरदेसाई यांचा समावेश
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे शिक्षकदिनानिमित्त दिले जाणारे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर केले आहेत.यामध्ये लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरच्या सहाय्यक शिक्षिका कविता रविकिरण सरदेसाई यांचा समावेश आहे.
महापालिका शाळेतील पाच व खासगी अनुदानित चार शाळेतील मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
महापालिका शाळा- आदर्श शिक्षक पुरस्कार पुढीलप्रमाणे : कविता रविकिरण सरदेसाई (सहायक शिक्षिका, लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर), स्वाती वसंतराव ढोबळे (सहायक शिक्षिका, लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर), सरिता प्रकाश सुतार (सहायक शिक्षिकालक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर), नेताजी आनंदा फराकटे (सहायक शिक्षक, लोणार वसाहत विद्यामंदिर), राजश्री सुनिल पोळ (सहायक शिक्षिका, संत रोहिदास विद्यामंदिर).
आदर्श शिक्षक पुरस्कार (खाजगी अनुदानित शाळा) पुरस्कारप्राप्त नावे : उज्वला सुनिल जाधव,(मुख्याध्यापक, डॉ. दिपक साळुंखे विद्यामंदिर), राजेंद्र तुकाराम कोरे (सहायक शिक्षक, श्री. सिध्देश्वर प्रासादिक विद्यालय विक्रमनगर), किरण श्रीरंग खटावकर (सहायक शिक्षक, डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिर), धनश्री दिगंबर जोशी ( सहायक शिक्षिका, शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालय)
विशेष शिक्षकेत्तर पुरस्कार : अजय माधवराव गोसावी (प्र. कनिष्ठ लिपिक, प्राथमिक शिक्षण समिती, मनपा, कोल्हापूर कार्यालय)
आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (म.न.पा. शाळा) रमेश आनंदराव पारखे ( सेवक, मनपा संत रोहिदास विद्यामंदिर, सुभाषनगर), शिवाजी शंकर जाधव, ( सेवक, यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर)
आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता महापालिकेच्या पाच शाळातील व खाजगी अनुदानित चार शाळातील मुख्याध्यापक, सहायक शिक्षकांनी प्रस्ताव कार्यालयाकडे सादर केले होते. पुरस्कार समितीने दोन सप्टेंबर रोजी संबंधित शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. पुरस्कार निवड समितीमध्ये उपायुक्त रविकांत आडसुळ, वरिष्ठ अधिव्याख्याता विजय भिसे, प्रशासनाधिकारी शंकर केशव यादव, दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्रभाकर शाहू हेरवाडे आणि शैक्षणिक पर्यवक्षक विजय माळी यांचा समावेश होता. प्रभारी प्रशासक नितीन देसाई यांची मान्यता घेऊन पुरस्कार प्राप्त आदर्श मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, विशेष शिक्षकेतर कर्मचारी व आदर्श शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे.









































































