Last Updated on 28 Nov 2021 8:20 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई शेअर बाजारात शनिवारी मोठी घसरण पाहायला मिळाली
मुंबई ।
दक्षिण अफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने आता जगभर चिंता वाढली आहे आणि याचेच परिणाम भारतीय बाजारातही दिसून आले आहे.शेअर बाजारात शनिवारी 2020 नंतरची सर्वात मोठी पडझड पाहायला मिळाली आहे.सेन्सेक्स तब्बल 1700 अंकांनी पडला तर निफ्टी 500 हून अधिक अंकांनी पडला.
दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या नव्या व्हॅरिएंटचा संसर्ग झालेले नवे रुग्ण आढळल्यानंतर जगभर खळबळ उडाली आहे.दक्षिण आफ्रिकेत मल्टिपल म्युटेशन असलेला कोरोनाचा व्हॅरिएंट आढळला आहे.त्यानंतर ब्रिटनने सहा आफ्रिकी देशांमधली विमान वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनाचा हा नवा व्हॅरिएंट पहिल्यापेक्षा जास्त घातक असल्याचे समजले जात असून, तो वेगाने पसरत आहे.या नव्या व्हॅरिएंटबद्दल चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन बैठक बोलावली आहे.या व्हॅरिएंटवर लसही प्रभावी ठरत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
अमेरिकन बाजारातही काल पडझड पाहायला मिळाली आणि याचेही परिणाम आज भारतीय बाजारात दिसून आले.मुंबई शेअर बाजारात शनिवारी मोठी घसरण पाहायला मिळाली.बाजार सुरू होताच निर्देशांकात 800 अंकांची घसरण झाली,त्यानंतर आणखी घसरण होऊन निर्देशांक 1400 अंकांनी खाली आला. तर निफ्टीचा निर्देशांक 200 अंकांनी घसरला.










































































