Last Updated on 12 Aug 2024 8:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोयना पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस झाला असून आज सोमवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 90.46 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.धरण 85.95 टक्के भरले आहे.
यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाला सुरूवात झाली.तर जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झाले.जून ते जुलै या दोन महिन्यांचा विचार करता जिल्ह्यात 44 टक्के अधिक पर्जन्यमान झाले.
मागीलवर्षी कमी पाऊस झाल्याने कोयना धरण पूर्ण भरलेले नव्हते.धरणाची पाणीसाठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे.पण, गतवर्षी 94 टीएमसीवरच साठा झालेला. यावर्षी, आताच धरणात 90.46 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यातच सध्या पाऊस कमी असलातरी धरणात आवक सुरूच आहे.अजूनही पाऊस होणार असल्याने धरण भरणार आहे.कोयनेत गतवर्षीच्या तुलनेत 5.87 टीएमसी पाणीसाठा अधिक आहे.
हेही वाचा – राज्यात पानमांजर, गिधाड, रानम्हैससाठी प्रजनन केंद्र; दुर्मिळ वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर…
सोमवारी (12 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 04 मिलिमीटर, नवजा येथे 15 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 07 मिलिमीटर इतकी अत्यल्प पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 4 हजार 284 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 5 हजार 089 आणि महाबळेश्वरमध्ये 4 हजार 843 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोयना धरण
दि.12/08/2024, वेळ:-सायंकाळी 05:00 वाजता
पाणीपातळी:2152’00″(655.930मी)
पाणीसाठा:90.46 टीएमसी(85.95 टक्के)
आवक:- 6,172 क्यूसेक्स
पायथा ग्रहातून 00 क्यूसेक्स विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 04/4284
नवजा 15/5089
महाबळेश्वर 07/4843
पूर नियंत्रण कक्ष, सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक–12/08/2024 5:00 PM
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/10’11”
2) बहे पूल-(23.7)5’5″
3) ताकारी पूल (46)/12’6″
4)भिलवडी पूल -(53)13’10”
5)आयर्विन- (45)/9’09”
6)राजापूर बंधारा-(58)/18’8″
7) राजाराम बंधारा-(43)/17’3″
पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 14200
2) आयर्विन पूल – 11327
3) राजापूर बंधारा – 36667
4) राजाराम बंधारा – 8581
5) कोयनाधरण- 90.47 TMC/0
6)वारणा धरण- 29.84 TMC/ 0
7)अलमट्टी धरण-118.221
आवक – 54830
जावक-15000









































































