Last Updated on 17 Aug 2025 12:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. महाबळेश्वर, कोयना धरण परिसरात पाऊस सुरु आहे. धरणातील पाण्याची आवक प्रतिसेंकद 37 हजार 289 क्युसेस अशी सुरू आहे.रविवारी (17 ऑगस्ट) सकाळी आठ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 93.02 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 88.38 टक्के भरले आहे. पुन्हा एकदा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरु असलेला पाऊस,त्यातच कोयना धरणातून 37 हजार 289 क्युसेसने सुरु असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
रविवारी (17 ऑगस्ट) सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 93 मिलिमीटर, नवजा येथे 174 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 128 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 105.25 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 93.02 टीएमसी इतका झाला असून धरण 88.38 टक्के भरले आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 3 हजार 353 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 3 हजार 968 आणि महाबळेश्वरमध्ये 3 हजार 928 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा…
भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे राज्यात १६ ते २१ ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. या दरम्यान ५०-६० किमी/ताशी वाऱ्यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असून मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सांगली पाटबंधारे विभाग सांगली
दि.17.08.2025, 8.00 AM
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)7’11”
2) बहे पूल-(23.7)/5’11”
3) ताकारी पूल (46)/10’0″
4)भिलवडी पूल -(53)/10’0″
5)आयर्विन- (45)/13’9″
6)राजापूर बंधारा-(58)/20’9″
7) राजाराम बंधारा-(43′)/26’5″
पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड-7663
2) आयर्विन पूल -15500
3) राजापूर बंधारा- 42625
4) राजाराम बंधारा-22396
5) कोयना धरण- 93.02 TMC/2100
6)वारणा धरण- 30.52 TMC/0
7)अलमट्टी धरण-120.417 TMC
आवक – 33968
जावक- 70000














































































