Last Updated on 16 Nov 2021 7:15 AM by Sanjay Patil/Adhorekhit
साहित्य : पिकलेली हिरव्या सालीची 9 केळी, अर्धा नारळ, 8 हिरव्या मिरच्या, दीड वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा मिरपूड, 1 चमचा जिरे, तळण्यासाठी तेल किंवा तूप, 4 अंडी, 1 वाटी वाळलेल्या ब्रेडचा चुरा, 1 लिंबू.
कृती : केळ्यांचे वडे करताना सर्वप्रथम नारळाचा चव, मिरच्या, कोथिंबीर, लसूण, मीठ, जिरे आणि मिरपूड एकत्र करून त्याची चटणी करावी. त्यावर लिंबाचा रस घालून चटणीत एकजीव करून घ्यावी. अंडी खूप फेटून ठेवावी. प्रत्येक केळ्याचे तीन तुकडे करून प्रत्येक तुकडा मध्ये अर्धा चिरावा व त्यात थोडी चटणी भरावी. असे सर्व तुकडे तयार ठेवावे. यानंतर कढईत तेल तापत ठेवावे. केळ्याचा एकेक तुकडा ब्रेडच्या चुर्यात घोळवावा. मग तो फेटलेल्या अंडय़ात बुडवावा व जरा निथळून कढईत तळावा. हे तिखट-डो असे केळ्यांचे वडे सर्वांना खूप आवडतील.











































































