Last Updated on 29 Sep 2021 1:31 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनाच्या क्रमांकाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. वाहनाच्या सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.वाहनांचे हस्तांतरण सुलभ होण्यासाठी केंद्र सरकारने ही नवीन सुविधा सुरू केली आहे.त्यासाठी वाहन मालकांना भारत सिरीज किंवा बीएच सिरीजमध्ये (BH-series) वाहनांची नोंदणी करावी लागणार आहे.याबाबतचे परिपत्रक केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने आज काढले आहे.
नवीन वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बीएच नोंदणीचा पर्याय मिळणार आहे. ज्या लोकांच्या नोकरीनिमित्त राज्ये बदलावी लागतात, त्यांना बीएच नोंदणीचा चांगला पर्याय असणार आहे. जर बीएच नोंदणीमध्ये वाहनाची नोंदणी केली तर दुसऱ्या राज्यात जाताना वाहन मालकांना नव्याने नोंदणी करावी लागणार नाही.यापूर्वी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहण्यासाठी गेलेल्या वाहन मालकांना वाहनांची नव्याने नोंदणी करावी लागत होती.नवीन सीरीज जुन्या वाहनांना लागू होणार नसली तरी देखील नवीन वाहने घेणाऱ्या लोकांसाठी फायद्याची ठरणार आहे.
मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 47 नुसार, मालकाला आपले वाहन ज्या राज्यातील वाहन आहे त्या राज्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवण्याची परवानगी नाही. निर्धारित कालावधीत मालकाला नवीन राज्य प्राधिकरणासह नवीन नोंदणी करणे आवश्यक आहे.
BH नोंदणीचे स्वरूप YY BH 4144 XX YY असे ठेवले आहे. यातील YY म्हणजे फर्स्ट रजिस्ट्रेशन. या वर्षातील गाडी असेल तर 21BH1234MH असा गाडी नंबर असू शकतो. अर्थात ही सुविधा वैकल्पिक आहे. या वर्षातील गाडी असेल तर 21BH1234MH असा गाडी नंबर असू शकतो.
कोणाला मिळणार ही सुविधा…
डिफेन्स, केंद्र, राज्य सरकारी कर्मचारी, खासगी कंपन्या ज्यांची कार्यालये 4 किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये आहेत.









































































