Last Updated on 29 Oct 2021 4:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली |
देश जेव्हा कोविड-19 महामारीशी लढा देत आहे ,तेव्हा केंद्रीय आस्थापनांमधील विविध वर्गीकृत रोजगारातील विविध श्रेणीतील कामगारांना मोठा दिलासा देत, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 1.10.2021 पासून परिवर्तनीय महागाई भत्ता (व्हीडीए ) चा दर लागू केला आहे.
औद्योगिक कामगारांसाठी,कामगार ब्युरोद्वारे (श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे संलग्न कार्यालय) संकलित केलेला किंमत निर्देशांक असलेल्या सरासरी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (सीपीआय -आय डब्ल्यू ) आधारावर परिवर्तनीय महागाई भत्ता निश्चित केला जातो. जानेवारी ते जून 2021 या महिन्यांसाठी सरासरी ग्राहक किंमत निर्देशांक हा सुधारित परिवर्तनीय महागाई भत्याची (व्हीडीए) हमी देण्यासाठी वापरण्यात आला.
श्रम आणि रोजगार, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री श्री भूपेंद्र यादव म्हणाले की, देशभरातील केंद्रीय क्षेत्रात विविध विविध वर्गीकृत म्हणजेच (अ) बांधकाम, रस्ते, धावपट्ट्यांची देखभाल, इमारत बांधणी कार्यान्वयन इ.; (ब) झाडलोट आणि साफसफाई (क) माल भरणे आणि उतरवणे ;(ड ) निगराणी आणि संवर्धन (इ ) खाणी आणि (फ ) शेतीयांसारख्या रोजगारातील सुमारे 1.5 कोटी कामगारांना याचा फायदा होईल.आणि हे पंतप्रधानांच्या “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” या संकल्पनेशी सुसंगत असून ही वाढ 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होईल असे सांगत त्यांनी सर्व देशबांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
देशभरातील केंद्रीय क्षेत्रात विविध वर्गीकृत रोजगारातील सुमारे 1.50 कोटी कामगारांना या निर्णयाचा फायदा होईल.
परिवर्तनीय महागाई भत्ता (व्हीडीए ) मधील ही वाढ विशेषत: सध्याच्या महामारीच्या काळात या कामगारांना आधार देईल.
विविध श्रेणीतील कर्मचार्यांसाठी वेतनाचे दर
| Schedule employment | Category of employees | Rate of wages including Variable Dearness Allowance Area wise per day (in Rupees) | ||
| A | B | C | ||
| Construction or maintenance of roads or runways or building operations etc. | Unskilled | 654 | 546 | 437 |
| Semi-Skilled/Unskilled Supervisor | 724 | 617 | 512 | |
| Skilled/Clerical | 795 | 724 | 617 | |
| Highly Skilled | 864 | 795 | 724 | |
| Sweeping and Cleaning |
— |
654 | 546 | 437 |
| Loading and Unloading workers |
— |
654 | 546 | 437 |
| Watch and Ward | Without Arms | 795 | 724 | 617 |
| With Arms | 864 | 795 | 724 | |
| Agriculture | Unskilled | 417 | 380 | 377 |
| Semi-Skilled/Unskilled Supervisor | 455 | 419 | 384 | |
| Skilled/Clerical | 495 | 455 | 418 | |
| Highly Skilled | 547 | 509 | 455 | |
For Mines employees
| Category | Above Ground | Below Ground |
| Unskilled | 437 | 546 |
| Semi-Skilled/Unskilled Supervisor | 546 | 654 |
| Skilled/Clerical | 654 | 762 |
| Highly Skilled | 762 | 851 |
केंद्रीय आस्थापनांमधील वर्गीकृत रोजगारासाठी निश्चित केलेले दर केंद्र सरकार, रेल्वे प्रशासन, खाणी, तेल क्षेत्र, प्रमुख बंदरे किंवा केंद्र सरकारने स्थापन केलेल्या कोणत्याही महामंडळाच्या अधिकाराखालील आस्थापनांना लागू आहेत.हे दर कंत्राटी आणि हंगामी कर्मचारी/कामगार यांनाही त्याचप्रमाणे लागू आहेत.
श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे संलग्न कार्यालय, कामगार ब्युरोने जारी केलेल्या औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारावर. केंद्रीय आस्थापनांमधील वर्गीकृत रोजगाराच्या संदर्भात किमान वेतन (व्हीडीए ) वर्षातून दोनदा म्हणजेच म्हणजे 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर रोजी सुधारित केले जाते, असे मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय ) श्री डी.पी.एस.नेगी यांनी सांगितले. राजपत्र अधिसूचनेनुसार या आदेशासाठी विचाराधीन कालावधी जानेवारी ते जून 2021 आहे.
केंद्रीय आस्थापनांमधील किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) संघटनेच्या तपासणी अधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय आस्थापनांमधील वर्गीकृत रोजगारातील कर्मचारी/कामगारांसाठी देशभरात सुनिश्चित केली जाते.











































































