Last Updated on 09 Jun 2023 7:00 AM by Sanjay Patil/Adhorekhit
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा जाहिरात प्रसिद्ध; प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्याची संधी
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकाना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा- 2023 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने माहे जून 2023 च्या शेवटच्या आठवडयात आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन प्रणालीव्दारे येत्या 06 जून ते 15 जून या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. केंद्रप्रमुख पदासाठी 2 हजार 384 जागांसाठी ही मेगाभरतीची जाहिरात निघाली आहे.
ही परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.
पात्रता
फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा. म.न.पा. खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
किंवा
प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून ३ वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील,
विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी पात्र राहतील.
Apply Link : https://opsonline.ibps.in/mscepapr23
लेखी परीक्षा स्वरूप योजना
परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल.
परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही.
सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील व त्यासाठी 2 तासाचा कालावधी राहील.
परीक्षेचे टप्पे – एक लेखी परीक्षा
परीक्षेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
प्रश्नपत्रिका – एक
एकूण गुण – 200
जिल्हानिहाय जागा अशा
नाशिक 122,नंदुरबार 33,धुळे 40,जळगाव 80,अमरावती 69,बुलढाण 65,अकोला 42,वाशिम 35,यवतमाळ 90,नागपूर 68,वर्धा 43,भंडारा 30,गोदिया 42,गडचिरोली 50,चंद्रपूर 66,छत्रपती संभाजीनगर 64,हिंगोली 34,परभणी 43,जालना 53,बीड 78,लातूर 50,धाराशिव 40,नांदेड 87,ठाणे 47,रायगड 114,पालघर 75,पुणे 153,अहमदनगर 123,सोलापूर 99,कोल्हापूर 85,सांगली 67,सातारा 111,रत्नागिरी 125 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 61 जागांवर केंद्रप्रमुख भरले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा- 2023- अधिसूचना PDF मध्ये
link
👇👇👇👇
Cluster Head Ad-2023_compressed










































































