Last Updated on 10 Dec 2025 8:52 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ऊस वाहतुक करणार्या वाहनांना रिल्फेक्टर बसविण्यात आले. व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कराड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, कराडचे मोटार वाहन निरीक्षक धनंजय हिले, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवानी सगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर गायकवाड, पोलिस अधिकारी संदेश वाघ, बळिराम घुले, संचालक बाबासो शिंदे, बाजीराव निकम, जे. डी. मोरे, विलास भंडारे, मॅनेंजींग डायरेक्टर बाजीराव सुतार, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जगदीश जगताप म्हणाले, अपघात टाळण्यासाठी व आपल्या सुरक्षिततेसाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. कराड व इस्लामपूर पोलीस अधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना सूचना दिल्या. यावेळी ऊस वाहतूक करणार्या वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यात आले. वाहनांचा वेग ठरवून दिला आहे. अतिवेगाचा वापर करू नये. वाहनचालकांनी व्यसन करू नये, वाहन चालवताना मोठ्याने गाणी लावू नयेत. ओव्हरलोड वाहने चालवू नये या सारख्या गोष्टी टाळून अपघात रोखता येतील. अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ऊस वाहतूक करणार्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. यावेळी जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.













































































