Last Updated on 13 Sep 2025 9:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
स्वराली मानेकडून अष्टपैलु खेळाचे प्रदर्शन
सांगली । कासेगाव शिक्षण संस्थेच्या कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयातील ज्युनियर विभागातील मुलींच्या संघाने 19 वर्षे खालील जिल्हास्तरीय शालेय महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
राजारामबापू पाटील इनडोअर स्टेडियम राजारामनगर येथे जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा झाल्या. कुसुमताई कॉलेज आणि सदगुरू कॉलेज या दोन संघात अंतिम सामना संपन्न झाला.यामध्ये कर्णधार स्वराली सुनील माने हिच्या अष्ठपैलु खेळाने कुसुमताईने विजेतेपद खेचले. तिला प्रियांका दाभाडे आणि श्रध्दा पाटील यांची साथ मिळाली.
काही हेडिंग द्या
या स्पर्धेतून विजेत्या संघाची सातारा येथे होणार्या कोल्हापूर विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजेत्या संघातील खेळाडूंना प्रशिक्षिक अभिषेक पवार, प्रा.शरद पाटील, प्रा.अजित शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे मार्गदर्शक आ. जयंत पाटील, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील, सचिव प्राचार्य आर.डी.सावंत, प्राचार्य डॉ.टि.जे.शिंदे, पर्यवेक्षक प्रा.बी.डी.जाधव यांनी अभिनंदन केले.













































































