Last Updated on 11 Mar 2023 12:31 AM by Sanjay Patil/Adhorekhit
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
सांगली । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त कासेगाव (ता वाळवा) येथे ‘जयंत केसरी’बैलगाड्या शर्यतीचे मैदान रविवार दि. १२ मार्च रोजी सकाळी १० वाजता आयोजित केलेले आहे. कासेगाव बैलगाडी संघटना व कै.शरद लाहिगडे मित्र परिवार या मैदानाचे आयोजक असून रुपये अडीच लाखाच्यावर बक्षिसांची धुळवड केली आहे.
कासेगाव येथील कृष्णा नदी रोडच्या बाजूला १५ एकर क्षेत्रात मैदाना ची जय्यत तयारी केली आहे. हे मैदान केवळ पश्चिम महाराष्ट्र नव्हेतर राज्यातील भव्य मैदान ठरेल,असा विश्वास मुख्य संयोजक, ग्रामपंचायत सदस्य अतुल लाहिगडे यांनी दिली.
या शर्यतीतील प्रथम विजेत्यास स्व.शरद लाहिगडे मित्र परिवार व त्रिमूर्ती गणेश मंडळ लाहिगडे-देशमुख गल्ली यांच्याकडून रुपये १ लाख ६ हजार २६५, द्वितीय विजेत्यास इस्लामपूरचे माजी नगरसेवक खंडेराव जाधव (नाना) यांच्याकडून रुपये ६२ हजार ६५, तिसऱ्या विजेत्यास इपिक यार्न्स प्रा.लि.चे सचिन बेडकळे,प्रशांत पाटील यांच्याकडून रुपये ३६ हजार २६५,चौथ्या विजेत्यास उद्योजक संजय देशमुख यांचेकडून रुपये २६ हजार २६५,पाचव्या विजेत्यास कै.विलास मारुती आडके यांच्या स्मरणार्थ डॉ.विक्रम आडके यांचेकडून १६ हजार २६५,तर सहाव्या विजेत्यास माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव पाटील यांच्याकडून रुपये ६ हजार २६५ बक्षिस दिले जाणार आहे. तसेच सर्व विजेत्यांना अभिनय राजाराम उबाळे (इस्लामपूर) यांच्याकडून कायम शिल्ड दिले जाणार आहे. सेमी फायनलमध्ये दोन नंबरला बाहेर पडणाऱ्या गाड्यांना लकी ड्रॉ पद्धतीने दोन सायकली बक्षीस देण्यात येणार आहेत. बैलगाड्या नोंदणीसाठी रुपये १ हजार प्रवेश शुल्क आहे.
रविवारी सकाळी १० वाजता राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते मैदानाचे उदघाटन करण्यात येईल. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी गट नेते शरदभाऊ लाड,माजी जि.प. सदस्य रणधीर नाईक,माजी नगरसेवक खंडेराव जाधव (इस्लामपूर),माजी जि.प. अध्यक्ष देवराज पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ.मानसिंग नाईक यांच्या हस्ते सायंकाळी ४ वाजता बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.
महादेव पाटील (भाऊ),बंडा देशमुख, मकरंद माने,विकास लाहिगडे,अक्षय लाहिगडे,सागर कांबळे,विक्रम गावडे,विक्रम शेठ,जितू पाटील,सोमनाथ लाहिगडे,सुशांत माने (पांड्या),विकास पाटील,अभिषेक दंडवते,संभाजी पाटील,हर्षद मुल्ला,रणजित बनसोडे यांच्या सह युवक कार्यकर्ते या स्पर्धेचे संयोजन करीत आहेत.









































































