Last Updated on 06 Oct 2024 11:36 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कामेरी (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास महाराष्ट्र शासनाचा सन २०२३-२४ या वर्षीचा कायाकल्प पुरस्कार मिळाला, पन्नास हजारांचे बक्षीस मिळाले आहे. सर्वोतम आरोग्य सुविधा, रुग्णसेवा आणि पर्यावरणपूरक वातावरण भौतिक सुविधा या निकषावर हा पुरस्कारा प्राप्त झाला आहे
आशिया राष्ट्रीय महामार्ग लगत हे प्राथमिक आरोग्य केंद्र असून कामेरी, विठ्ठलवाडी, शिवपुरी, वाघवाडी तुजारपूर, येडेनिपाणी ही गावे या आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली येतात. आरोग्य केंद्रात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर राणोजी शिंदे तर वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर नितीन चिवटे हे कार्यरत आहेत.
हेही वाचा – कामेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास कायाकल्प पुरस्कार
सरासरी रोज शंभर ते दीडशे बाह्य रुग्ण तपासले जातात. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने कायाकल्प या स्पर्धेचे आयोजन केले होते.
यामध्ये उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अशा सर्व रुग्णालयाचा सहभाग होता. यामध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्राने सहभाग नोंदवला होता. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा, रुण्ण सेवा, अंतबहिय स्वच्छता, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा, आपत्कालीन सेवा, तत्पर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग, परिचारिका, व औषधपुरवठा स्वच्छता असा सर्व पातळीवरील कामाची पाहणी करण्यात आली.
सर्वोत्तम आरोग्य सुविधा, रुग्णसेवेवर भर
राज्य शासनाचा सन २३-२४ या वर्षीचा कायाकल्प पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र, कामेरीस मिळाला आहे. तसेच गतवर्षीही हा पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाला होता. या पुरस्काराने आम्हा सर्वांची जबाबदारी वाढली असून गुणवत्तापूर्ण व विनम्र सेवा देण्याचे काम आम्ही रुग्णांना करू.
डॉ. राणोजी शिंदे
वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कामेरी.








































































