Last Updated on 05 Nov 2021 4:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करून घेण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.न्यायालयाने मनाई करूनही राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी माघार घेतलेली नसून,संप चिघळला आहे.दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.
तसेच राज्य सरकारला तुमच्या मागण्यांविषयी विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश देऊ, असे संकेतही उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित याचिकेवर उद्या दुपारी अडीच वाजता पुन्हा सुनावणी ठेवली आहे.
संप करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना द्यावे लागतील असा इशारा हायकोर्टाने एसटी संघटनेला दिला. सणासुदीच्या काळात संप करून सामान्य जनतेला वेठीस धरणे योग्य नसल्याचे हायकोर्टाने म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य सरकारला देऊ असेही हायकोर्टाने म्हटले.










































































