Last Updated on 12 Oct 2025 3:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
५६ वर्षातील पहिला कामगारांचा सहकुटुंब स्नेह मेळावा उत्साहात
सांगली । आपल्या कामगारांची मुले-मुली चांगले शिक्षण घेवून देश आणि परदेशात यशस्वी वाटचाल करीत असल्याचे पाहून समाधान वाटते. आपण सर्वांनीच आपल्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे. शिक्षण हे आपल्या व कुटुंबाच्या प्रगतीचे मोलाचे साधन असल्याचे भान कायम ठेवा,असे आवाहन माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी साखर कामगारांना केले.५६ वर्षातील पहिला कामगारांचा सहकुटुंब स्नेह मेळावा उत्साहात पार पडला.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या सहकुटुंब स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी संचालक कार्तिक पाटील,विठ्ठल पाटील,डॉ.योजना शिंदे-पाटील,कार्यकारी संचालक आर.डी. माहुली,कामगार नेते राजेंद्र चव्हाण,तानाजी खराडे,कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील,अनिलकुमार पाटील,कामगार प्रतिनिधी विकास पवार,मनोहर सन्मुख प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील,श्रीमती कुसुमताई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
आ.पाटील म्हणाले,प्रतिक पाटील यांच्या संकल्पनेतून संपन्न होत असलेल्या कामगारांच्या सहकुटुंब स्नेह मेळाव्यात सहभागी होताना आनंद होत आहे. आपण जयंत उडान हे अँप तयार केले आहे. यातून युवकां ना नोकरी मिळविण्यास आणि नवा व्यवसाय सुरू करण्यास मार्गदर्शन व सहकार्य करणार आहोत. आपल्या मुलांनाही याचा या अँपचा वापर करण्याचा सूचना कराव्यात.
प्रतिकदादा पाटील म्हणाले,स्व.बापूंचे विचार आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामगारांना प्राधान्य देत काम करीत आहोत. कामगारांचे प्रश्न सोडवीत त्यांना विविध सोई सुविधा देण्यावर आमचा भर आहे. भविष्यत कामगार व त्यांच्या कुटुंबिया साठी विविध उपक्रम राबवू.
याप्रसंगी कामगार युनियनच्या वतीने आ.जयंतराव पाटील व प्रतिकदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ४५ उत्कृष्ठ कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि गणेशोत्सव २०२४ व २५ चे बक्षीस वितरण करण्यात आले.
कामगार युनियनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे यांनी प्रतिक दादा पाटील यांनी कामगारांचे बरेच प्रश्न मार्गी लावले असून उर्वरित प्रश्नही लवकरच सोडविले जातील,असा विश्वास व्यक्त केला.
कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांनी स्वागत,तर कामगार कल्याण व जिमखाना समितीच्या अध्यक्षा डॉ.योजना शिंदे पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी संचालक प्रतापराव पाटील,दादासाहेब मोरे,शैलेश पाटील,दिलीपराव देसाई,हणमंत माळी, रामराव पाटील,जनरल मॅनेंजर एस.डी.कोरडे, विजय मोरे,संताजी चव्हाण,सुनिल सावंत, प्रेमनाथ कमलाकर,डॉ.प्रकाश म्हाळुंगकर, संभाजी सावंत यांच्यासह अधिकारी,कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील यांनी आभार मानले. निलेश साठे यांनी सूत्रसंचालन केले.
५६ वर्षातील पहिला कामगारांचा सहकुटुंब स्नेह मेळावा
सहकुटुंब स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यास कामगार आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहारदार गीतांचा कार्यक्रम, पंचपक्वनाची मेजवानी आणि साहेब, प्रतिक दादांशी थेट संवाद अशा वातावरणात हा स्नेह मेळावा पार पडला.














































































