Last Updated on 15 Nov 2021 4:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.काँग्रेसने आज याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचे तिकीट देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचे निधन झाले.त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली आहे.या जागेसाठी जागेसाठी चंद्रकांत हंडोरे,नसीम खान,जितेंद्र देहाडे या काँग्रेस नेत्यांच्या नावाचीही चर्चा होती.
काँग्रेस नेते राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा होती.मात्र,प्रज्ञा सातव यांना राज्यसभेचे तिकीट नाकारण्यात आले.त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आले होते.काँग्रेसने दिलेला शब्द पाळत प्रज्ञा सातव यांना उमदेवारी जाहीर केली आहे.









































































