Last Updated on 20 Nov 2021 10:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली |
सरकारने काही वस्तूंवर वस्तू आणि सेवा कर वाढवला,ज्यामुळे त्यांच्या किमती पूर्वीच्या तुलनेत वाढतील.ज्या वस्तूंवर जीएसटी वाढवण्यात आला आहे, त्यात तयार कपडे, कापड तसेच पादत्राणे यांचा समावेश आहे.यापूर्वी या वस्तूंवर 5 टक्के जीएसटी आकारला जात होता,तो आता 12 टक्के करण्यात आला.हा नवा नियम जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.सरकार कपडे आणि रेडिमेड कपड्यांवरील जीएसटी वाढवू शकते,अशी शक्यता बऱ्याच दिवसांपासून वर्तवली जात होती.GST दर वाढवण्याची अधिसूचना केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने 18 नोव्हेंबर रोजी अधिसूचित केली आहे.
आधी दर काय होते, पुढे काय होणार?
नवीन घोषणेनुसार फॅब्रिक किंवा धाग्यावरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आलाय.तसेच तयार ड्रेसवर 12 टक्के जीएसटी आकारला जाईल.याआधी ज्यांच्या किमती 1,000 रुपयांपर्यंत होत्या,अशाच कपड्यांवर 5 टक्के जीएसटी होता.आता सर्व ड्रेसेसचा 12 टक्के यादीत समावेश करण्यात आलाय. कापडाचे दरही 12 टक्के करण्यात आलेत.यामध्ये विणलेले सूत, सिंथेटिक धागे, ढीग कापड,ब्लँकेट,तंबू,टेबल क्लॉथ,टॉवेल,रुमाल,टेबलवेअर,कार्पेट्स,रग्ज,कमर आणि ज्या कापडांवर चित्रे (टेपेस्ट्री) बनवली जातात,त्यांचा जीएसटी दर 5 वरून वाढला आहे. तो 12 टक्के करण्यात आलाय. फुटवेअरवरील जीएसटी 5 टक्के (रु. 1000/जोडी) वरून 12 टक्के करण्यात आला आहे.














































































