Last Updated on 29 Oct 2021 1:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
कन्नड चित्रपटांचा सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी पक्षाघाताने निधन झाले. ते 46 वर्षांचा होते आणि खूप फिट होता.त्यांच्या निधनाने कन्नड चित्रपट जगता आणि सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे.
पुनीत यांना आज (शुक्रवारी २९ ऑक्टोबर) दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर सतत नजर ठेवून होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली. बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे चाहते रडत आहेत. आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आहेत.
पुनीत राजकुमार हा कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.. ‘सुवरत्थान’ या चित्रपटात ते अखेरचे दिसले होते.त्याच फिल्मसाठी त्यांची खूप वाहवा झाली होती. ‘सुवरत्थान’ या चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला होता.










































































