Last Updated on 29 Nov 2021 1:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली |
संपूर्ण जगाची धाकधुक कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा वाढवली आहे. जगभरातील सर्वच देशांनी दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटची पुष्टी झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे. नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देश दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांबाबत सतर्क झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेहून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला होता. जगभरातील सर्वच देश ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकन देशांतून उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे.अशातच आपल्या सर्वांच्या मनात हाच प्रश्न आहे की, ओमिक्रॉन व्हेरिएंट आहे तरी काय आणि त्याची लक्षण नेमकी काय?
जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत दिलेल्या माहितीनुसार
1) यापूर्वी कोरोना बाधित झालेल्या रुग्णांना ओमिक्रॉन संक्रमण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे अशा रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहे.
2) ओमिकॉन डेल्टा व्हेरिएंटपेक्षा किती संसर्गजन्य आहे याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही.तसेच,केवळ आरटीपीसीआर चाचणीतून या संसर्गाची माहिती मिळू शकते.
3) कोरोना प्रतिबंधक लसीचा ओमिक्रॉन व्हेरिएंटवर होणा-या परिणामांचा अभ्यास सुरू असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
4) ओमिक्रॉन संसर्गामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे की नाही याबाबत देखील माहिती उपलब्ध नाही.तसेच,ओमिक्रॉनची लक्षणे इतर व्हेरिएंटपेक्षा वेगळी असल्याचेही आढळून आलेले नाही.
5) दक्षिण आफ्रिकेत वाढलेल्या रुग्णांची संख्या ओमिक्रॉन असेल असे म्हणता येणार नाही.ओमिक्रॉन व्हेरिएंटची गंभीरता समजून घेण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.
5) कॉर्टिकोस्टिरॉईड्स आणि |L6. रिसेप्टर ब्लॉकर्स गंभीर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी अजूनही प्रभावी आहेत.ओमिक्रॉन प्रकारातील व्हायरसच्या काही भागांमध्ये झालेले बदल पाहता ते अजूनही तितकेच प्रभावी आहेत की नाही हे पाहण्यासाठी इतर उपचारांचे मूल्यांकन केले जाईल.
7) सध्या,WHO ओमिक्रॉनला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी जगभरातील संशोधकांशी समन्वय साधत आहे.सध्या सुरू असलेल्या अभ्यासात संक्रमणाची तीवता,लक्षणे,लसींची कार्यक्षमता चाचण्या आणि उपचारांची परिणामकारकक्ता याबाबत संशोधन केले जाईल.










































































