Last Updated on 13 Jan 2023 10:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत राज्य सरकारने 300 कोटी रुपये त्वरित वितरित करून गोड केली आहे.त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
एसटी कर्मचाऱ्यांना पगाराचा तिळगुळ सरकारनं दिला आहे.हा निर्णय घेऊन खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे,हे सिद्ध करून दाखविले.
तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित 18 मागण्यांबाबत एक व्यापक बैठक घ्यावी,याबाबत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री महोदय यांना त्यासंदर्भात निवेदन देऊन चर्चा केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील त्याला तात्काळ होकार देत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासित केले.









































































