Last Updated on 27 Nov 2021 8:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महसूल विभागाद्वारे ई-पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात 15 ऑगस्टपासून राज्यभर करण्यात आली आहे.टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली असून,पीक पेरणी अहवालाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित होण्याच्या दृष्टीने आणि पीकविमा व पीक पाहणी दावे निकालात काढण्यासाठी या ॲपचा चांगला उपयोग होणार आहे.या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील,तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील.तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे.या प्रणालीत शेतकऱ्यांचा थेट सहभाग असल्याने पारदर्शकता आणणे शक्य झाले आहे.शेतकऱ्यांनी स्वतः त्यांच्या शेतात पेरलेल्या पिकांची ई-पीक पाहणी मोबाईल ॲपचा वापर करून नोंद होणार आहे.

अण्णासाहेबांचे काम झाले सोपे
टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील,तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील.पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल.शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल.मागील काही वर्षांमध्ये तलाठ्यांची संख्या घटल्याने दोन-तीन गावांचा कार्यभार एक तलाठ्यावर पडताे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची नोंद करणे अशक्य होत आहे.यासाठी शेतकरी आणि तलाठी यांच्यात काही वेळा वादाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, यावर राज्य सरकारने एक अभिनव कल्पना काढल्याने अण्णासाहेबांचे काम सोपे झाले आहे.
ई पीक पाहणी अँप वर नोंदणीसाठी च्या पायऱ्या
- स्टेप 1– सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गूगल प्ले स्टोअर वर जा ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करायचे आहे. हे ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी. पिक पेरणी ची माहिती सदरामध्ये तुमच्या जमीनीचा भूमापन क्रमांक / गट क्रमांक निवडावा.
- स्टेप 2–जेव्हा तुम्ही तुमचा गट क्रमांक निवडला त्यावेळी तुमच्या जमीनीचे एकूण क्षेत्र किती आहे व पोटखराब क्षेत्र बद्दल सर्व माहिती दर्शवली जाईल. नंतर हंगाम निवडायचा आहे. हंगामामध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्षापैकी हंगाम निवडू शकतात. पीक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र दर्शवली जाईल.
- स्टेप 3– पिकांच्या वर्गामध्ये एक पिक पद्धती, मिश्र पीक, पॉली हाउस, शेडनेट हाऊस, पिक,पडीत क्षेत्र यापैकी योग्य पर्याय निवडावा. जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पिकांची नोंद करण्यापूर्वी जमिनीत कायम पड क्षेत्र असल्यास, प्रथम काय पड जमिनीची नोंदणी करावी. लोकांचा वर्ग निर्भेळ पीक निवड केल्यानंतर निर्वेड पिकाचा प्रकार, फळ व फळपीक पर्याय दिसतील. यापैकी योग्य पर्याय निवडावा.
- स्टेप 4– एक पर्याय निवडून शेतातील पिकाचे नाव निवडून क्षेत्राची नोंदणी करावी. फळपीक पर्याय निवडल्यास फळझाडांची संख्या नक्षत्र नमूद करावे. मिश्र पीक निवडल्यानंतर पिके आणि क्षेत्र नमूद करावे.
- मिश्र पिकाचे क्षेत्र नमूद करताना त्यातील घटक पिकांनी व्यापलेल्या क्षेत्राच्या प्रमाणात विभागून टाकावी. त्यातील घटक पिकांच्या क्षेत्राची बेरीज एकूण क्षेत्रा पेक्षा जास्त होऊ नये.
- स्टेप 5– चालू हंगामामध्ये जमीन पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड केली नसल्यास अशावेळी चालू पडक्षेत्र निवड करावी. जल सिंचनाचे साधन पर्याय खाली पिकांना पाणी देण्यासाठी ज्या सिंचन साधनांचा उपयोग करत आहात तो पर्याय निवडावा. त्यानंतर सिंचन पद्धत निवडायचे आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे यापैकी एक पर्याय निवडणे अपेक्षित आहे. शेतकरी या ठिकाणी पिकप पेरणी केलेला/ लागवड केलेला पिकाचा दिनांक नमूद करतील.
मुख्य पिकांसाहित दुय्यम पिकांची नोंद करा.
- मिश्र पीक निवडल्यानंतर तुमच्या शेतामध्ये जी पिके लावलेली आहेत आणि जेवढ्या क्षेत्रावर लावलेली आहेत ते क्षेत्र या ठिकाणी टाईप करा.
- मुख्य पिक, दुय्यम १ आणि दुय्यम २ अशी पिकांची वर्गवारी या ठिकाणी करावी लागणार आहे.
जल सिंचनाचे साधन या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीवर टच करतातच सिंचनाचे अनेक साधने या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्यापैकी तुमची तुमच्या पिकांना पाणी देण्यासाठी ज्या जल सिंचनाचा उपयोग करत आहात त्या पर्यायावर टच करा.
- त्यानंतर सिंचन पद्धत निवडायची आहे जसे कि ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन किंवा अन्यप्रकारे सिंचन या पैकी एक पर्याय या ठिकाणी शेतकऱ्याने निवडणे अपेक्षित आहे.
- लागवडीचा दिनांक या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीमध्ये ज्या दिवशी तुम्ही तुमच्या शेतामध्ये पिकांची लागवड केली आहे तो दिनांक तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे.
- सर्वात शेवटी तुमच्या शेतातील जे मुख्य पीक आहे त्या पिकाचे छायाचित्र या ठिकाणी घ्यायचे आहे. त्यासाठी कॅमेरा आयकॉन वर टच करा.
- जसे हि तुम्ही कॅमेरा आयकॉन वर टच कराल त्यावेळी तुमच्या मोबाईलमधील कॅमेरा सुरु होण्यासाठी काही परवानगी या ठिकाणी लागेल त्यासाठी allow या पर्यायावर तुम्ही टच करू शकता.
- फोटो काढल्यावर submit या बटनावर टच करा. तर अशा पद्धतीने पीक माहिती सबमिट आणि अपलोड झालेली आहे.
- पिकांची माहिती या पर्यायावर टच करून तुम्ही भरलेली माहिती बघू शकता जर तुम्हाला असे वाटत असेल कि माहिती चुकीची भरली गेली आहे तर हि माहिती डिलीट म्हणजेच नष्ट सुद्धा करू शकता.
ई पीक पाहणी ॲपचा उपयोग करून बांधावरील झाडे नोंदविणे.
शेतकऱ्यांच्या बांधावर बरीच झाडे असतात या पैकी जर आंबा, बोअर, पिंपळ, कडूनिंब व अजूनही इतर प्रकारची झाडे असतील तर शेतकरी हि झाडे स्वतः सातबऱ्यावावर नोंदवू शकतात. बांधावरील झाडे सातबऱ्यावर नोंदविण्याची पद्धत कशी आहे ती समजावून घेवूयात.
- ई पीक पाहणी ॲपच्या डॅशबोर्डवर दिसत असलेल्या बांधावरील झाडे या बटनावर टच करा.
- खाते क्रमांक निवडा.
- शेताचा गट क्रमांक निवडा.
- दिलेल्या यादीतून तुमच्या शेताच्या बांधवावर जे झाड असेल ते निवडा.
- झाडाची संख्या दिलेल्या चौकटीत टाका.
- सर्वात शेवटी बांधावरील झाडाचे छायाचित्र अपलोड करा यासाठी कॅमेरा आयकॉनच्या बटनावर टच करा.
- आमच्या शेताच्या बांधावर बोरीचे झाड आहे महणून आता या ठिकाणी बोर या झाडाचा फोटो काढून तो अपलोड करत आहे.
- छायाचित्र काढल्यावर सबमिट करा या बटनावर क्लिक करा.
ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी न केल्यास होणार शेतकऱ्यांचे नुकसान
शेतकऱ्यांनी स्वतः त्यांच्या शेतात पेरलेल्या पिकांची e pik pahani मोबाईल ॲपचा वापर करून नोंद करायची आहे. हि नोंद न केल्यास शेतकऱ्यांचा सातबारा या रकान्यामध्ये असलेला पिकांचा रकाना कोरा राहणार आहे. ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंद न केल्यास खालील नुकसान शेतकऱ्यांस होणार आहे.
- शेतकऱ्यांचे शेत पडीक दाखविले जाईल किंवा पेरणी झालीच नाही असे दाखविले जाईल.
- पिक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होईल.
- प्रधान मंत्री पिक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहील.
- एखाद्या ठराविक पिकास शासनातर्फे मदत जाहीर झाली तर त्याचा लाभ मिळणार नाही.
- जंगली जनावरांनी शेतातील पिकांचे नुकसान केले तर त्याचा लाभ मिळणार नाही.

८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी
महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी या व्यापक प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 89 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर नोंदणी केली असून मराठवाड्यात सर्वाधिक नोंदणी झाली आहे.आजअखेर ई- पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत, 89 लाख 39 हजार 848 शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर नोंदणी केली आहे, तर 64 लाख 48 हजार 368 शेतकऱ्यांची ई-पीक ॲपवरील नोंदणी पूर्ण झाली आहे.















































































