Last Updated on 16 Dec 2021 8:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली |
उरुण इस्लामपूर शहरातील अनेक रस्त्यांच्या कामाला सभागृहात मंजुरी होऊन कित्येक दिवस झाले तरी ही प्रशासनाच्या वेळकाढुपणामुळे कामे रेंगाळलेली होती.यावर उरुण- इस्लामपूर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी नगराध्यक्ष दालनात कंत्राटदारांची बैठक घेऊन रस्त्यांची कामे तात्काळ सुरु करण्याचे आदेश दिले.
नगरपालिकेकडील मुख्याधिकारी या पदावर राज्यशासनाकडुन अधिकार्यांची नियुक्ती न झाल्याने अनेक विकासकामे थांबली होती.याचबरोबर सभागृहात मंजुर कामांना हि गती मिळाली नाही.गुरुवारी नगराध्यक्ष दालनात रस्त्याची कामे सुरु करण्याबाबत कंत्राटदारांची बैठक बोलविण्यात आली होती.या बैठकीत सर्व कंत्राटदारांना सर्व रस्त्याची कामे लवकर सुरू करून चांगल्या दर्जाचे करण्याचे आदेश लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी दिले.
यावेळी नगरसेवक वैभव पवार , माजी नगरसेवक भास्कर कदम,विजय पवार,रियाज पटेल,नगरपालिका बांधकाम विभाग प्रमुख अविनाश जाधव, कंत्राटदार संपत पाटील,सचिन सावंत,कुंदन पाटील,सर्जराव जाधव,अमृत पाटील,भुषण पाटील,ओंकार मिरजकर,कमलेश शहा,बबलु पाटील,संग्राम पाटील,दादा गुंजाटे,अमोल पाटील सतीश पाटील, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.













































































