Last Updated on 19 Nov 2021 7:24 AM by Sanjay Patil/Adhorekhit
स
एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षा २०२१ मध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

सांगली ।
गुणवंतांच्या पाठीशी वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी सदैव उभी राहील असे प्रतिपादन वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य ॲड.धैर्यशील पाटील यांनी केले.
वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे विद्यामंदिर हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षा २०२१ मध्ये उज्ज्वल यश संपादन केले त्यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव ॲड.बी.एस.पाटील (आण्णा) होते.

यावेळी अनुक्रमे अंकिता कदम,अंकिता मोहिते,वैष्णवी पाटील,आदिती पवार,जुई कुलकर्णी,पायल पाटील,दीक्षा पवार,प्रणोती माने,प्राजक्ता वाटेगावकर,सलोनी शिंदे,दिग्विजय शेखर,सुषमा पाटील,मनाली थोरात,सिद्धी साळुंखे,ओमकार पाटील,पृथ्वीराज लाड,मृदुला पाटील,अथर्व घारे,प्रतीक मोरे,आदित्य जोशी,दिग्विजय नाईक,सिद्धी अवसरे,कुणाल साळुंखे,तनुजा मोहिते,प्राची पाटील आणि मनस्वी पुदाले या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.सर्व यशवंत-गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य संजय पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्रा.विजयकुमार शिंदे तर आभार प्रा.मकरंद बडवे यांनी मानले.यावेळी ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा.शशिकांत पाटील,प्रा.संजय नागरगोजे,प्रा.बाळासो शिरोटे,प्रा.एस.आर.महिंद प्रा.वाय.आर.माने,प्रा.ए.टी. पाटील,प्रा.एस.एन.पाटील,प्रा.एस.बी. पाटील,प्रा.एस.डी.खोत,प्रा.एमपी.करळे,प्रा.हर्षल पाटील,प्रा.पी.आर.मोहिते,प्रा.एम.डी.पाटणकर,प्रा.आर.आर.सिसाळे,प्रा.ए.डी.पाटील,प्रा.अनुराधा पवार,प्रा.वैशाली लोहार,प्रा.अमरजा पाटील,प्रा.अशोक धुमाळ,प्रा.डी.एस.मुल्ला,प्रा.सुजाता देसाई,प्रा.प्रतिभा पुदाले,प्रा.ए.एम.दुधाळे, प्रा.सिंधुताई खोत,प्रा.व्ही.एच.जाधव तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि गुणवंत विदयाध्यांचे पालक उपस्थित होते.











































































