Last Updated on 20 Jun 2020 8:12 AM by
तहसीलदारपदी राकेश गिड्डे (एरंडोली),असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्सपदी राजवर्धन पाटील (इस्लामपुर)
इस्लामपुर : येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीच्या ४ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परिक्षांमधून घवघवीत यश संपादन केले.यामध्ये तहसीलदारपदी राकेश गिड्डे (एरंडोली),असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्सपदी राजवर्धन पाटील (इस्लामपुर), तर नायब तहसीलदारपदी अमर गायकवाड (विटा),वैष्णवी पुजारी (आटपाडी) यांची निवड झाली.
राकेश गिड्डे यांची याआधी नायब तहसीलदारपदी निवड झाली होती,तर अमर गायकवाड यांनी एकाच वर्षी राज्य कर निरीक्षक व नायब तहसीलदारपदी निवड झाली,तसेच वैष्णवी पुजारी यांनी एकाच वर्षी गुप्त वार्ताधिकारी,कर निर्धारक नगरपालिका व नायब तहसीलदारपदी निवड झाली.कर्मवीर प्रबोधनीमध्ये राज्यसेवा,पोलीस उपनिरीक्षक,राज्यकर निरीक्षक,सहाय्यक कक्ष अधिकारी,विक्रीकर निरीक्षक,गुप्त वार्ताधिकारी,कर सहाय्यक,मंत्रालय लिपिक,तसेच सरळ सेवांतर्गत भरतीचे मार्गदर्शन केले जाते.२०१९-२० मध्ये प्रबोधिनीच्या आतापर्यंत ६९ विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड झाली आहे.
सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ.एन.डी.पाटील,संस्थेचे अध्यक्ष मा.आर.डी.पाटील,ऍड.एन.आर.पाटील,सचिव सौ.सरोज पाटील,माजी प्राचार्य विश्वास सायनाकर,केंद्र संचालक प्रा.अजितकुमार पाटील,सहाय्यक निबंधक रणजित पाटील,विक्रीकर निरीक्षक जगदीश साळुंखे,विक्रीकर निरीक्षक नवनाथ खरात,प्रा.अमित पुजारी यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले.













































































