Last Updated on 31 Dec 2021 4:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर येथे राजारामबापु नाटयगृहात प्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ घेणार मुलाखत
सांगली ।
उरुण- इस्लामपूर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांची प्रकट मुलाखत प्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ घेणार आहेत,ही प्रकट मुलाखत रविवार दि.२ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता इस्लामपूर येथील राजारामबापु नाटयगृह येथे होणार असल्याची माहीती निशिकांतदादा युथ फौंडेशन व निशिकांतदादा स्पोर्टस फौंडेशनच्या पदाधिकारी यांनी दिली.
निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांची संघर्षमय वाटचाल,शिक्षण,आरोग्य क्षेत्रातील यशस्वी प्रवास,समाजकार्य, अलिकडील राजकारणातील प्रवास,गेल्या पाच वर्षातील शहरातील विकासात्मक वाटचाल व भविष्यातील व्हिजन या विषयाच्या अनुषगांने निशिकांतदादांच्या इतिहासातील घडामोडी व भविष्यातील वाटचाल याची पाने या मुलाखतीत उघडली जाणार आहेत.
या मुलाखतीचे थेट प्रेक्षपण फेसबुक,ट्विवर,इस्टाग्राम,यु ट्युबवर पहाता येणार येणार, व्हाटसअप लिंक हि पाठवली जाणार आहे तरी या कार्यक्रमास शहरातील नागरीक,सामाजीक संस्थेचे पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,शिक्षण,आरोग्य क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपा वाळवा तालुका अध्यक्ष धैर्यशिल मोरे,वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत,भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार,भाजपाचे जेष्ठ नेते मधुकर हुबाले,प्रांजली अर्बन निधी बॅकेचे चेअरमन संदीप सावंत,भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप,स्मिता पवार,युवा नेते अजित पाटील,अक्षय पाटील,भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सतेज पाटील,संघटन सरचिटणीस प्रविण परीट,अक्षय कोळेकर,विकास परीट,सुयश पाटील,गौरव खेतमर,अल्ताफ तहसिलदार,मुकुंद रास्कर,संदीपराज पवार,कुलदीप खांबे,अशोक भिंगार्डे आदिसह अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते विशेष परीश्रम घेत आहेत.














































































