Last Updated on 03 May 2022 9:44 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
जाएंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर,संस्कृती सहेली,जाएंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर,संस्कृती सहेली तर्फे निनाईनगर, इस्लामपूर येथील मंदिर परिसरात येणाऱ्या आबालवृद्ध भाविकांची गरज लक्षात घेऊन दोन सिमेंट बाक देण्यात आले.
सिमेंट बाकचा लोकार्पण कार्यक्रम देवस्थान कमिटी,भाविक व जाएंट्सच्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाला.यावेळी जा. वे. फौं. चे माजी अध्यक्ष डॉ. नितीन पाटील,इस्लामपूर सहेलीच्या माजी अध्यक्षा सौ.संगीता शहा,अध्यक्षा सौ. श्रद्धा कुलकर्णी,संस्कृती सहेलीच्या अध्यक्षा सौ. स्मिता पाटील,उपाध्यक्षा गौरी सुतार,सदस्या सुजाता लोखंडे उपस्थित होत्या.युनिट डायरेक्टर डॉ. अनिल निर्मळे यांचे सहकार्य लाभले.गणेश कदम, महेंद्र बेलवलकर, गीता बेलवलकर, आदित्य बेलवलकर उपस्थित होते.










































































