Last Updated on 26 May 2023 7:42 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कृष्णात पिंगळे हे आता भुसावळचे उप विभागीय पोलीस अधिकारी
सांगली । गेल्या दहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या इस्लामपूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदी मंगेश चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त होते.दरम्यान,इस्लामपूर विभागाचे नूतन पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी बुधवारी इस्लामपूर उप विभागाचा पदभार स्वीकारला.
राज्यातील 139 पोलीस पोलीस उपअधीक्षक तसेच 143 पोलीस निरीक्षकांची पदोन्नतीने अशा एकूण 282 पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी रात्री निघाले.
नूतन पोलीस उपअधीक्षक पदी मंगेश चव्हाण हे याआधी कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक पदी कार्यरत होते.इस्लामपूर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची जुलै 2022 मध्ये बदली झाली होती.तेव्हापासून हे पद रिक्त होते.त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार याची उत्सुकता होती.पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची वर्धा पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
त्याचबरोबर राज्यातील 139 पोलीस पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी रात्री निघाले.तर 143 पोलीस निरीक्षकांची पदोन्नतीने पोलीस उप अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.त्यांनाही नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
नूतन पोलीस उपअधीक्षक चव्हाण हे दुबई व कझाकिस्तान येथे झालेल्या ट्रायथोलॉन स्पर्धेत ‘आयर्न मॅन’ ठरले होते.चव्हाण या ‘आयर्न मॅन’ हा बहुमान दोनवेळा मिळाला आहे.महाराष्ट्रातील पहिले पोलीस उपअधीक्षक म्हणून ‘आयर्न मॅन’ ठरले आहेत.चव्हाण हे मूळचे सातारा येथील रहिवासी असून,सध्या ते कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान,पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची सोमवारी वर्धा पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती झाली होती.बुधवारी त्यांची सुधारित पदस्थापना करण्यात आली.पोलीस उपअधीक्षक पिंगळे हे आता भुसावळचे उप विभागीय पोलीस अधिकारी असतील.












































































