Last Updated on 30 Dec 2021 4:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुख्याधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे मागितला ‘ना हरकत’ दाखला
सांगली ।
महाराष्ट्र राज्यातील सत्ताबदल 101झाला आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले तसे उरूण- इस्लामपुर शहरातील विकासकामातील निधी व सभागृहातील जनरल मिटींग ला राष्ट्रवादी च्या नगरसेवकांच्या प्रि प्लॅन दांड्यानी व नगरपालिका प्रशासनाचा वेळकाढुपणा यामुळे अलिकडील वर्षभरात शहराच्या विकासावर चांगलाच परीणाम झाला आहे.यातुन शहराच्या व नागरीकांच्या सोयीसुविधेसाठी चक्क लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी शहरातील रस्ते स्वखर्चातुन करणेसाठी ना हरकत दाखला मिळावा म्हणुन थेट नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे पत्राव्दारे विनंती केली असल्याची माहीती भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत यांनी दिली.
अशोकराव खोत म्हणाले,राष्ट्रवादीच्या विचाराची सत्ता सलग ३१ वर्षे होती मात्र हे सत्ताधारी या शहरातील नागरीकांना नागरी सुविधा देऊ शकले नाहीत,शहरातील अनेक प्रश्न प्रलंबीत राहीले,विकास आघाडी व मित्र पक्ष शिवसेना यांनी गत निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का देत,३१ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला,याची सल आज ही राष्ट्रवादीला आहे.राज्यातील सत्ता बदल झाला आणि उरूण -इस्लामपूर नगरपरीषदेचे सभागृह विकासकामे व राष्ट्रवादीचे नगरसेवक यांच्या जनरल मिटींग च्या दांड्यानी गाजत आहे.
विकास आघाडी व मित्र पक्ष शिवसेना यांचा सत्तेतील कार्यकाळ संपत आला आहे,मागील सभागृहात मंजुर ठरावातील कामे प्रशासनाचा वेळकाढुपणामुळे ठप्प आहेत, यावरुन ही सत्ताधार्यांनी प्रशासनाला धारेवर धरले मात्र प्रशासन आज ही सुस्त आहे.प्रशासन कोणच्या दबावाखाली आहे का ? किंवा प्रशासन वेळकाढुपणा का करते हे शहरातील जनतेला ज्ञात आहे.आम्हि सत्ताधारी याचा हिशोब येणार्या निवडणुकीत देणार आहे यात शकां नाही. राष्ट्रवादी व प्रशासन यांचा अलीकडील वर्षातील एकोपा शहरातील खेळखंडोबा ला कारणीभुत ठरला आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी कारभारातील पादर्शकता व विकासकामातील दर्जेदारपणा टिकवत शहाराचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला,वेळ प्रसंगी त्यांना सभागृहात कणखर भुमीका घ्यावी लागली तर प्रशासनाचा वेळकाढुपणा व राष्ट्रवादी च्या नगरसेवकांची सभागृहातील मिटींगमधील विकासकामांना कधी विरोध तर कधी अनुउपस्थिती ही पेच निर्माण करणारी ठरली.या अवस्थेत शहरातील विकासाची गती मंदावली.
हे आहेत रस्ते…
शहरातील नागरीकांच्या अपेक्षा व विकासकामाची बांधीलकी जपत लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले -पाटील (दादा) यांनी शहरातील झरी नाका ते निराळे मामा दुकानापर्यतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे,संभाजी चौक ते जीवनमामा दुकानापर्यतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे,सावकर काॅलनी ते कडगांवे घरापर्यतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे,मणिकंडन हाॅटेल ते पोस्ट ऑफीस ते विजय लाईट हाऊसपर्यतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे,मटण मार्केट ते दुर्गा रेस्टाॅरंटपर्यतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे वरील प्रमाणे रस्ते नगरपरीषद फंडातुन व शासन योजनेमध्ये समाविष्ठ करण्यात आलेले नाहीत,त्या रस्त्यांची दूरावस्था झालेली आहे,या भागातील नागरीक वारंवार रस्ता करणेबाबत विनंती करत आहेत,रस्त्यांची कामे होणे आवश्यक व निकडीचे असल्याने मी लोकनियुक्त नगराध्यक्ष या नात्याने माझे प्रथम कर्तव्य असल्याने वरील रस्ते स्व खर्चातुन करणार आहे,तरी या कामी मला ना हरकत दाखला मिळावा अशी मागणी मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्याकडे लेखी केली आहे.आमची बांधिलकी शहरातील नागरीकांशी व शहर विकासाशी आहे.असे शेवटी अशोकराव खोत म्हणाले.









































































