Last Updated on 11 Sep 2025 7:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
संजना पतंगे द्वितीय, ऋतुजा मुसळे तृतीय, स्नेहल पाटील चतुर्थ, तर विद्या साळुंखे पाचवा क्रमांक
सांगली । उरूण इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेत अमृता नांगरे यांनी प्रथम,संजना पतंगे यांनी द्वितीय, तर ऋतुजा मुसळे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे. निर्मला सांस्कृतिक कार्यालयात हजारो महिलांच्या साक्षीने माजी मंत्री आ.जयंत पाटील, युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले. शहराध्यक्षा पुष्पलता खरात व महिला कार्यकर्त्यांनी स्पर्धेचे उत्कृष्ठ नियोजन केले.
स्पर्धेचा निकाल – चौथा क्रमांक-स्नेहल पाटील, पाचवा क्रमांक-विद्या साळुंखे, विशेष प्राविण्य-लक्ष्मी ताटे, कुसुम पाटील, शर्मिला बिचकर, शारदा डुबल, प्राची रावळ, दिपाली पाटील, साधना लोहार, सविता कांबळे,
उत्तेजनार्थ- सुरेखा कुटेकोमल सन्मुख, संगिता कांबळे, सविता नांगरे, ऋतुजा थोरात, शारदा कदम, मेघा खांडके, ज्योती कदम, स्वाती माने, स्नेहा हाके, सलाम जमादार.
आ.पाटील म्हणाले, या स्पर्धेतील महिलां चा उत्स्फूर्त प्रतिसाद कौतुकास्पद आहे. महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यावर आमचा भर आहे. आपण शहरातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यास पोलीस खात्यास २ लाख ५० हजार रुपये दिले आहेत. शहरातील नागरिक व महिलांची सुरक्षितता महत्वाची आहे.
पुष्पलता खरात म्हणाल्या,आम्ही आ.जयंत पाटील, युवा नेते प्रतिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षापासून ही स्पर्धा घेत आहोत. राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी व जयंत दारिद्र्य निर्मुलन अभियानचे आम्हास सहकार्य लाभले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, महिला तालुकध्यक्षा सुनिता देशमाने, संचालक शैलेश पाटील, प्रिती लोळगे, शैलजा जाधव, वैशाली पाटील, मालन वाकळे, माया जाधव, सुवासिनी जंगम, प्रा.स्वाती चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रा.शामराव पाटील, खंडेराव जाधव, बाळासाहेब पाटील, सुभाषराव सुर्यवंशी, शंकरराव चव्हाण, सुनिता संपकाळ, रुपाली जाधव, शुभांगी शेळके, जयश्री पाटील, लता कुर्लेकर, प्रतिभा पाटील, इंदूताई मोरे यांच्यासह शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व गृहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपाध्यक्षा मनिषा पेठकर, गीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रियांका साळुंखे यांनी आभार मानले.














































































