Last Updated on 05 Oct 2021 4:40 AM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्रोमध्ये लवकरच तब्बल 167 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. ही भरती इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट अप्रेन्टिस या पदांसाठी असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. 08 ऑक्टोबर 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
या पदांसाठी नोकर भरती
इंजिनिअरिंग अप्रेन्टिस
मॅनेजमेंट अप्रेन्टिस
एकूण जागा – 167
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
इंजिनिअरिंग अप्रेन्टिस – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित इंजिनिअरिंगच्या ब्रांचमध्ये 65% किंवा 6.84 CGPA इतके मार्क्स मिळवले असणे आवश्यक आहे. तसेच फुल टाइम इंजिनिअरिंग केले असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार नाही.
मॅनेजमेंट अप्रेन्टिस – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित 60% गुणांसह हॉटेल मॅनेजमेंट किंवा कॅटरिंगची पदवी घेतली असणे आवश्यक आहे. तसेच मॅनेजमेंटमध्ये पूर्णवेळ शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
काही महत्त्वाच्या सूचना
या ठिकाणी कराल अर्ज
यासाठी पुढील कागदपत्रे अनिवार्य
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑक्टोबर 2021
भरती संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://rmt.vssc.gov.in/GA2021/s.jsp या लिंकवर क्लिक करा











































































