Last Updated on 22 Aug 2025 9:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत सांगली जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती व नोंदणीसाठी https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
इस्त्राईल देशात “होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स” या पदासाठी 5 हजार नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्याकरिता इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या, वय वर्षे 25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण, पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाव्दारे प्रदान केलेल्या मिडवायफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 04 May 2026 3:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit सिसिलिया कार्व्हालो, विवेकानंद गोपाल, सुरेंद्र दरेकर, रणधीर शिंदे, अनंत कदम यांचा समावेश ईश्वरपूर । राज्याचे माजी मंत्र... Read more










































































