Last Updated on 15 Oct 2021 3:14 AM by Sanjay Patil/Adhorekhit
Infosys कंपनीत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 45 हजार पदांसाठी होणार भरती!
नवी दिल्ली :
नुकतेच शिक्षण पूर्ण झालेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसमध्ये मोठी भरती होणार आहे. यावर्षी इन्फोसिस कंपनीमध्ये जवळपास 45 हजार फ्रेशर्सची भरती केली जाणार आहे.इन्फोसिस कंपनीच्या या निर्णयामुळे चांगल्या नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या तरुणांना दिलासा मिळाला आहे.
इन्फोसिसचे सीईओ प्रवीण राव या संदर्भात बोलताना म्हणाले बाजारात असलेल्या सर्व संभावनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात असून या वर्षी नव्या कॉलेज पदवीधर भरतीत वाढ केली आहे. यंदा ४५ हजार फ्रेशर्सची भरती केली जाणार आहेच पण कर्मचाऱ्यांच्या हेल्थ व वेलनेस सुविधा, रीस्किलिंग प्रोग्राम व करियर ग्रोथ संधींवर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नेट प्रॉफीट मध्ये ११.९ टक्क्यांची वाढ होऊन तो ५४२१ कोटींवर गेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने बुधवारी सांगितले की, या वर्षी कंपनीमध्ये जवळपास 45,000 फ्रेशर्सची भरती करणार आहे.
Infosys Mega Recruitment 2021
- इन्फोसिसकडून ही घोषणा अशा वेळी आली आहे, ज्यावेळी कंपनीचा अॅट्रिशन रेट म्हणजेच कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर लक्षणीय वाढला आहे आणि आयटी कंपन्यांमध्ये चांगले टेक्नॉलॉजी टॅलेंट घेण्याची स्पर्धा आहे.
- इन्फोसिसचे सीओओ प्रवीण राव यांनी सांगितले की, “बाजारातील सर्व क्षमतेचा लाभ घेण्यासाठी आम्ही आमच्या कॉलेज ग्रॅज्युएट हायरिंग प्रोग्रॉमला या वर्षी वाढवून 45,000 पर्यंत घेऊन जाणार आहोत.
- याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या कर्मचार्यांच्या गरजा पूर्ण करणे सुरू ठेवणार आहोत, ज्यात हेल्थ आणि वेलनेसचे उपाय, रिस्किलिंग प्रोग्रॉम आणि करिअर वाढीच्या संधी यांचा समावेश आहे.”









































































