Last Updated on 05 May 2025 5:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर बस आगारात ५ गाड्यांचे लोकार्पण…
सांगली । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून इस्लामपूर आगाराला ५ नवीन बसेस मिळाल्या असून या नव्या ५ बसेसचे माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
सांगली विभाग नियंत्रक सुनिल भोकरे ,इस्लामपूर आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे, मिलिंद कुंभार, दिपक यादव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व प्रवासी उपस्थित होते. इस्लामपूर आगारास नव्या बसेस मिळाल्याने वाळवा तालुक्या तील प्रवासांचा प्रवास अधिक सुखकर होणार असून प्रवाशांमधून याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

आ.जयंत पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांना १४ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्र लिहून इस्लामपूरसह सांगली जिल्ह्यासाठी नव्या बसेसची मागणी केली होती. त्यानुसार सांगली जिल्ह्यास नव्या ४० बसेस मिळाल्या. आज त्यातील पहिल्या टप्प्यात ५ बसेस इस्लामपूर आगारास मिळाल्या आहेत.
आ.जयंत पाटील यांनी सर्व बसेसचे पूजन करून श्रीफळ वाढविले. यावेळी त्यांनी इस्लामपूरहून अक्कलकोटला जाणाऱ्या बस मधून प्रवासही केला. या प्रवासात त्यांनी सांगली विभाग नियंत्रक सुनिल भोकरे, व इस्लामपूर आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे यांच्यासमवेत प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा व परिवहन विभागास येणाऱ्या अडचणीबद्दल सविस्तर चर्चा केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, पिरअली पुणेकर, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, आयुब हवलदार, मनिषा पेठकर, सुप्रिया पेठकर, संदीप माने, बाळासो कोळेकर, राहुल नागे, प्रविण पाटील आदी उपस्थित होते.









































































