Last Updated on 05 Oct 2023 7:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था,इस्लामपूर संचलित मा. आण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल,आष्टा या शाळेस इयत्ता आठवीपासून N.C.C. मान्यता मिळाली.5 ऑक्टोंबर 2023 रोजी या विभागाचे अधिकारी कर्नल जे. पी. सत्तीगिरी,कमांडिंग ऑफिसर,19 महाराष्ट्र एन. सी. सी बटालियन कराड यांचे हस्ते आज मान्यता फलकाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी त्यांचे सहकारी सुभेदार मेजर पद्मबहादूर थापा व सुभेदार राजेद्र तनंगी व हवलदार तानाजी कोळेकर व चंद्रशेखर मिसाळ हे त्यांच्या बरोबर उपस्थित होते.
या कोर्समध्ये इयत्ता 8 वीच्या 25 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून पुढे नववीत त्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.पुढील वर्षीपासून आठवीत नवीन येणाऱ्या 25 व यावर्षी आठवीत असलेले व नववीत गेलेले २५ N.C.C. कॅडेट असे दोन वर्षांनी २५ कॅडेट N.C.C. चा कोर्स पुरा करतील.अशा विद्यार्थ्यांना पोलीस खात्यात व सैन्यांमध्ये उच्च पदावर जाण्याची संधी प्राप्त होईल.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. आण्णासाहेब डांगे यांनी कर्नल जे. पी. सत्तीगिरी व त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच स्कूलचे प्राचार्य मा. सुभाष पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.









































































