Last Updated on 27 May 2023 5:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कासेगाव शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स काॅलेजचा इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी शरद अनिल बागडी याची 19 वर्षाखालील राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी (गोळा फेक) या प्रकारामध्ये निवड झाली आहे.
या स्पर्धा येत्या 6 ते 10 जून अखेर भोपाळ (मध्यप्रदेश) येथे होणार आहेत.
त्याचे आ.जयंत पाटील संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील,सचिव प्राचार्य आर.डी.सावंत,सहसचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र कुरळपकर यांनी अभिनंदन केले.त्याला प्रा.आशुतोष आडके,वडील अनिल बागडी व कोच यांचे मार्गदर्शन लाभले.









































































