Last Updated on 18 Nov 2021 10:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आयुष्यात पराजयाला मात देत यशाची शिखरे गाठायची असेल तर सर्वप्रथम आळशीपणा अंगातून हटवणे गरजेचे असते. काही महत्वपूर्ण टिप्स…
- व्यायाम आणि ध्यान : आळसापासून दूर राहण्यासाठी सकाळी उठल्या नंतर दररोज व्यायाम करावा, त्यामुळे तुमचा पूर्ण दिवस हा चांगल्या मूड मध्ये जाणार. तसेच व्यायामामुळे तुम्ही दिवसभर उत्साही दिसणार.
- ध्यानस्थ बसा : आपण जेव्हा ध्यानस्त बसतो तेव्हा आपण आपल्या शरीरावर ध्यान केंद्रित करू शकतो ज्यामुळे आपले विचार आणि आपला स्वभाव बदलू शकतो.
- यशस्वी लोकांच्या गोष्टी वाचणे. : माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी मोटीवेशन ची गरज असते. तुम्ही एखाद्या यशस्वी व्यक्तींचे आत्मचरित्र वाचू शकता ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा भेटेल.
- आवश्यक झोप : माणसाला सरासरी आठ तासाच्या झोपेची आवश्यकता असते. त्यापेक्षा जास्त झोप पण तुमच्यात आळशीपणा निर्माण करू शकते. त्यासाठी दिवसातून कमीत कमी 8 तास झोप घ्यावीच.
- भावनांकडे दुर्लक्ष करा : ज्या भावना तुम्हाला आळसाकडे घेऊन जातात, आणि काम करण्यामध्ये अडथळा आणतात. अश्या भावनांकडे दुर्लक्ष करा.
- स्वतःची रोजनिशी बनवा : दररोजच्या जीवनात तुम्ही स्वतःचे वेळापत्रक बनवा जेणेकरून तुम्हाला कोणते वेळी काय काम करावे हे लक्षात राहील आणि तुम्ही स्वतःच्या कामात व्यस्थ राहाल.
- कामांचे नियोजन : आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या कामांना छोट्या छोट्या कामांमध्ये विभागून घ्या आणि ते पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला आळस हि येणार नाही आणि काम हि पूर्ण होईल.
- सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा : जर तुम्ही नकारात्मक वातावरणात राहिले तर नकारात्मक उर्जा तुमच्यात येणार, आणि सकारात्मक वातावरणात राहिले तर सकारात्मक उर्जा येणार म्हणून सकारात्मक लोकांच्या सहवासातच राहा.
- सुरुवात तर करा : शेवटची आणि महत्वाची टिप्स म्हणजे सुरुवात करणे. तुम्ही एक वेळ कामाची सुरुवात करण्याचे ठरवा. कोणतेही काम हाती घेतले कि ते काम करण्याची इच्छा आपोआप निर्माण होत असते.











































































