Last Updated on 08 Oct 2021 5:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ ची जाहीरात प्रसिद्ध केली होती.यात राज्य सेवा परीक्षेअंतर्गत २९० रिक्त पदांसाठी १६ संवर्गात भरती केली जाणार होती.मात्र एमपीएससीकडून आता पदसंख्येत वाढ केली आहे.१०० पदे वाढल्यामुळे आता एमपीएससीकडून ३९० पदांसाठी २ जानेवारी २०२२ ला राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
ऑक्टोबरला आयोगाने पहिल्यांदा जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीत 290 जागांसाठी 2 जानेवारी 2022 ला राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र आयोगाने सुधारित जागांची जाहिरात प्रसिद्ध केली असून शंभर जागांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 2 जानेवारीला होणारी पूर्व परीक्षा 390 जागांसाठी होणार आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

असा आहे पदांचा तपशील
उपजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16 , गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15, उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर 1, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1,सहकारी कामगार अधिकारी 54, मुख्याधिकारी गट ब 75, मुख्याधिकारी गट अ 15 पदं, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ 10 पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.









































































