Last Updated on 05 Jun 2020 3:23 PM by
इस्त्रायल आणि पॅलेस्टीन या दोन देशातील नागरिकांत सतत धुमश्चक्री सुरु असते. इतकेच नव्हे तर इस्त्रायल पाच शत्रू देशांनी घेरलेला देश आहे आणि त्यामुळे त्याची सुरक्षा हा नेहमीच ऐरणीचा मुद्दा राहिला आहे. इजिप्त, जॉर्डन, सिरीया, लेबानन आणि पॅलेस्टाईन अशी पाच शत्रू देश आणि इस्त्रायल याच्यात सतत असुरक्षिततेचे वातावरण असते. इस्त्रायलने यातून मार्ग काढताना आपल्या देशाची सीमा सुरक्षित करण्यासाठी महाप्रचंड आणि अत्याधुनिक उपकरणांनी परिपूर्ण अशी भिंत उभारली असून त्यासाटी प्रचंड खर्च केला आहे. १९९४ साली बांधकाम सुरु झालेल्या या भिंतीसाठी २ अब्ज डॉलरपेक्षा अधिक खर्च केला गेला आहे.

१०६८ किमी लांबीची ही भिंत काही ठिकाणी १६ फुट तर काही ठिकाणी ८ ते १० मीटर उंच आहे. लेबानन सीमेजवळ रेंजर फेन्सिंग आहे तर गाजा पट्टीत कॉंक्रीट वापरले गेले आहे. पॅलेस्टाईन सीमेजवळ तिची लांबी ७०० किमी आहे. या भिंतीवर अत्याधुनिक कॅमेरे, थ्री डी सेन्सर इमेजिंग उपकरणे असून त्यातून भिंतीपलीकडे सुरु असलेल्या हालचाली टिपता येतात.
भिंतीवर लष्करासाठी बुलेटप्रुफ केबिन्स आहेत तसेच इस्त्रायलचे स्वतंत्र उपग्रह यंत्रणा असल्याने ड्रोनच्या सहायानेहि या भिंतीवर पाळत ठेवता येते. या भिंतीमुळे इस्त्रायलच्या सीमा सुरक्षित झाल्या आहेतच पण त्यामुळे लष्करावरील खर्चात बचत झाली आहे असे समजते.














































































