Last Updated on 04 Nov 2021 5:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जगातील प्रत्येक व्यक्तीचे आपल्या घरात राहण्याचे स्वप्न असते,परंतु फार कमी लोक आपल्या आयुष्यात हे स्वप्न पूर्ण करू शकतात.कारण कमी उत्पन्न आणि जास्त खर्च यामुळे लोकांना घराचा खर्चही चालवता येत नाही,अशा परिस्थितीत ते घर कसे विकत घेणार किंवा बांधणार.पण जिथे घर घेण्यासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज नाही,पण इथे तुम्ही फक्त 100 रुपयांमध्ये घर घेऊ शकता.मात्र,यासाठी तुम्हाला एक छोटीशी अट पूर्ण करावी लागेल.
हे घर तुम्हाला भारतात सापडणार नाही,पण तुम्हाला हे घर इटलीमध्ये अब्रुझो राज्यातील प्राटोला पेलिग्ना नावाच्या ठिकाणी मिळेल.प्राटोला पेलिग्ना हे एपेनिन पर्वताच्यामध्ये स्थित आहे.येथे लोकांना राहण्यासाठी फक्त 100 रुपयांत घर मिळत आहे.येथील सरकारने एक योजना सुरू केली असून त्याअंतर्गत लोकांना स्वस्त घरे दिली जात आहेत.
सरकारची ही योजना प्रतोला पेलिग्नामध्ये काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आली आहे.ज्यांना घराची गरज आहे त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. येथे सरकारला 250 घरे विकायची आहेत.तथापि, खरेदीदारांना त्याची दुरुस्ती करावी लागेल, ज्यासाठी खूप पैसे खर्च होऊ शकतात.
सरकारने घर खरेदीसाठी घातली ‘ही’ अट
या भागात कोणाला घर घ्यायचे असेल तर त्याला सरकारची एक अट पूर्ण करावी लागेल.त्यानंतर त्याला अवघ्या 100 रुपयांत घर मिळेल.प्रातोला पेलिग्ना प्राधिकरणानुसार,सहा महिन्यांत घराची दुरुस्ती न केल्यास घराच्या मालकाला सुमारे 9 लाख रुपयांचा दंड भरावा लागेल.त्यामुळे घर खरेदी केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत घराची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
हे घर स्की रिसॉर्टच्या अगदी जवळ आहे. याशिवाय इटलीची राजधानी रोम देखील काही किलोमीटर अंतरावर आहे.याआधीही अनेकदा एक युरोमध्ये घर विकण्याची योजना इटालियन अधिकाऱ्यांनी आणली होती.या घरांचा लिलाव होणार असून त्याची सुरुवात एक युरोपासून होईल.तीन वर्षांत घरमालकांना ते राहण्यायोग्य बनवावे लागणार आहे.जर कोणी इटलीच्या बाहेर राहत असेल आणि तो खरेदी करत असेल, तरी त्याला त्यासाठी 2 लाख 62 हजार रुपये शुल्क द्यावे लागेल.याआधीही येथील सरकारने स्वस्त घरांची योजना आणखी अनेक शहरांमध्ये राबवली होती.














































































