Last Updated on 31 Oct 2021 7:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
शिवसेनेच्या नेत्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्मिलाने ट्वीट करून कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. दिवाळीच्या दिवसात नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहनही तिने ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.
माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मी बरी असून घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेणार आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही तिने केले आहे. दिपोत्सव जवळ आला आहे. त्यामुळे या दिवसात सर्वांनी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी’, असेही तिने म्हटले आहे.














































































