Last Updated on 04 Oct 2023 8:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । सांगली जिल्ह्याचे सुपुत्र,पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.मितेश घट्टे यांचा पुणे येथे ‘लाईफ स्फूर्ती’पुरस्काराने गौरव करण्यात आला.माजी मंत्री आ. जयंतराव पाटील,श्री.चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प.सुदामराव गोरखे (गुरुजी) यांच्या हस्ते,लाईफ माईंडेड एनिशिएटिव्ह फॉर एम्पॉवरमेंट (लाईफ) या संस्थेच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी आ.संग्राम थोपटे,माजी महापौर मुरलीधर मोहोळ प्रामुख्याने उपस्थित होते.
पारनेर-नगरचे आ.निलेश लंके,भारत पेट्रोलियम चे मुख्य महा व्यवस्थापक संतोष सोनटक्के,जेष्ठ विधीज्ञ अँड.मिलींद पवार, श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनाही लाईफ स्फूर्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे,पीएचएन टेक्नॉलॉजीचे संचालक प्रदीप नारायणकर,केक स्टोरीचे संचालक मयूर चौखंडे, स्टुडंट हेलपिंग हँडसचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर,पोलीस उपनिरीक्षक पूजा राऊत,सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल बनसोडे याना ‘विशेष युवा प्रेरणा’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आ.पाटील म्हणाले,लाईक च्या वतीने समाजाच्या विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करून चांगल्या कामास प्रोत्साहन दिले आहे. डॉ.मितेश घट्टे हे आमच्या इस्लामपूर चे असल्याचा आम्हाला अभिमान आहे. डॉ.मितेश घट्टे यांनी सत्कारास उत्तर देताना म्हणाले,मी पोलीस खात्यात असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या हातून खात्यात जे काही काम झाले त्याचे श्रेय मी माझे वरिष्ठ व सहकाऱ्यांना देतो.
याप्रसंगी लाईफचे अध्यक्ष ओंकार कोंढाळकर,उच्च न्यायालयातील विधीज्ञ अँड.भूषण राऊत,उपाध्यक्ष आदित्य जोशी, सचिव प्रज्वल कोंढरे,सचिव प्रधूम्न किराड यांनी या शानदार सोहळ्याचे उत्तम नियोजन केले.









































































