Last Updated on 26 Jul 2025 1:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, उरुण- इस्लामपूर येथे शस्त्रक्रियेला यश
सांगली । पाटण तालुक्यातील ५५ वर्षीय महिलेच्या अंडाशयामध्ये तब्बल ३ किलो वजनाची गाठ निर्माण झाली होती. गेल्या तीन महिन्यांपासून त्या महिलेला पोटदुखीचा त्रास जाणवत होता. अखेर प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, उरुण इस्लामपूर येथे शस्त्रक्रिया करून ही गाठ यशस्वीरीत्या काढण्यात आली.

ही जोखमीची शस्त्रक्रिया डॉ. दिग्विजय सुरेश कदम व डॉ. सायली प्रविण साळुंखे यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडली. तसेच डॉ. उदयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. ही शस्त्रक्रिया जवळपास २ तास चालली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून, तिच्या पोटदुखीच्या त्रासातून तिला आता नवीन जीवन मिळाले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, योग्य वेळी निदान आणि शस्त्रक्रिया झाल्यामुळे रुग्णाचा जीव वाचू शकला.
या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल प्रकाश हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.











































































