Last Updated on 20 Jan 2025 9:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | इस्लामपूर येथील ॲड. वैभव कुलकर्णी यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. वैभव कुलकर्णी हे इस्लामपूर न्यायालयात गेल्या २५ वर्षापासून वकिली व्यवसाय करीत असून ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत, त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत आहे.
कायदेशीर दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यासाठी अधिकृत व्यक्ती म्हणून नोटरी हे फार महत्त्वाचे आहे. व्यवहार योग्यरीतीने पार पाडले जातील, याची खात्री करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी कायदेशीर कागदपत्रे नोटरी केली जातात, post of Notaries नोटरीची नियुक्ती सरकारी प्राधिकरणामार्फत केली जाते. भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने नोटरीचा परवाना मिळविण्यासाठी पात्रता धारक वकिलांना अभासी अर्ज भरण्याचे आवाहन केले होते,’ त्यानुसार अनेकांनी यामध्ये अर्ज केले. त्यांच्या काही महिन्यापूर्वी मुलाखती झाल्या होत्या त्यानुसार नोटरीपदी निवड झालेल्या वकिलांची यादी नुकतीच जाहीर झाली. जाहीर यादीनुसार नोटरी व्यवसाय प्रमाण पत्र प्राप्त होऊ लागली आहेत.










































































