Last Updated on 22 Jul 2020 5:06 PM by
साहित्य : भातासाठीः दीड वाटी बासमती तांदूळ 10 मिनिटे भिजवून, 1 चमचा तेल, 3 छोटी वेलची, 1 मोठी वेलची, 2 लवंग, 1 दालचिनी तुकडा, 1 तमालपत्र, दीड वाटी दूध, मीठ, मसालाः दीड वाटी शिजवलेला काळा वाटाणा, पाव वाटी तूप, 2 चमचे आलं-लसूण पेस्ट, पाव वाटी टोमॅटो चिरून, 2 हिरव्या मिरच्या चिरून, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा हळदपूड, 1 वाटी बटाटय़ाचे तुकडे वाफवून, 4 चमचे दही, मीठ, दही मिश्रणः पाव वाटी दही, 1 चमचा गरम मसाला पावडर, चिमुटभर वेलचीपूड, मीठ, इतरः पाव वाटी कोथिंबीर, 2 चमचे पुदिना, 1 चमचा आलं खिसून, 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, पाव चमचा केशर दुधात भिजवून, 2 चमचे तळलेला कांदा.
कृती : गरम तेलात भातासाठी दिलेला मसाला परतवून त्यात पाणी आणि दूध ओतावे. नंतर तांदूळ टाकून शिजवावा. गरम तुपात आलं-लसूण पेस्ट टाकावी. नंतर इतर साहित्य, बटाटे व काळा वाटाणा टाकून शिजवावे. खोलगट पातेले घेऊन त्यात काळा वाटाणा मिश्रण घालावे. त्यावर कोथिंबीर, पुदिना, आलं आणि हिरवी मिरची टाकावी. त्यावर दही मिश्रण, भात, केशर, तळलेला कांदा टाकून 10 मिनिटे वाफवून बिर्याणी रायत्यासोबत खाण्यास द्या.












































































