Last Updated on 12 Mar 2022 8:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली |
सांगली जिल्ह्याचे सुप्रसिध्द शाहीर देवानंद माळी, बजरंग आंबी व रामचंद्र जाधव यांनी महाविकास आघाडीच्या दोन वर्ष पूर्ती निमित्त शासनाने घेतलेल्या अनेक लोककल्याणकारी योजनांची आपल्या शाहिरी बाण्यांने विविध गावात प्रसिध्दी करत आहेत.
शाहीर बजरंग आंबी यांनी तासगाव तालुक्यात तासगाव, चिंचणी व मणेराजुरी येथे तर शाहीर रामचंद्र नायकू जाधव यांनी जत तालुक्यातील उमदी व आटपाडी तालुक्यात आटपाडी व दिघंची येथे आपल्या बहारदार कार्यक्रमांव्दारे शासनाच्या योजनांची प्रसिध्दी केली.
तासगाव तालुक्यात पेड, सावळज व कवठेएकंद येथे, शाहीर देवानंद माळी यांनी कडेगाव तालुक्यात कडेगाव, कडेपूर व चिंचणी येथे तर शाहीर रामचंद्र नायकू जाधव यांनी आटपाडी तालुक्यातील माडगुळे, करगणी व शेटफळे येथे आपल्या बहारदार कार्यक्रमांव्दारे शासनाच्या योजनांची प्रसिध्दी केली.







































































