Last Updated on 07 Aug 2024 10:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मराठा क्रांती मोर्चाच्या मिरज व सांगली शहरात मोटार सायकल रॅली व सभेच्या अनुषंगाने वाहनांसाठी मनाई आदेश जारी
सांगली । विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 8 ऑगस्ट 2024 ते 21 ऑगस्ट 2024 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 8 ऑगस्ट 2024 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 21 ऑगस्ट 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.
मराठा क्रांती मोर्चाच्या मिरज व सांगली शहरात मोटार सायकल रॅली व सभेच्या अनुषंगाने वाहनांसाठी मनाई आदेश जारी
मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्हा यांच्या वतीने दि. 8 ऑगस्ट 2024 रोजी मिरज व सांगली शहरात मोटार सायकल रॅली व राम मंदीर चौक सांगली येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रॅली व सभेमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक (स्त्री, पुरुष, मुले) सामील होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणतेही वाहन गर्दीत घुसून नागरिकांच्या जिवितास धोका पोहोचू नये याकरीता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्यये दि. 8 ऑगस्ट 2024 रोजी सांगली व मिरज शहरातील पुढील मार्गावर पोलीस वाहने, अॅम्बुलन्स, फायर बिग्रेड, महानगरपालिकेची स्वच्छता करणारी वाहने या वाहनांखेरीज सर्व वाहनांना पुढीलप्रमणे मनाई आदेश लागू केला आहे.
रॅली व सभेकरीता येणाऱ्या नागरिकांसाठी सांगली शहरात प्रवेश करण्याकरीता असणारी सर्व प्रवेश मार्गाची माहिती. एंट्री पाँईटचे नाव – मिरजकडून येण्याकरीता विजयनगर चौक, आलदर चौक, कोल्हापुर रोडकडून येण्याकरीता इनाम धामणी रोड मार्गे, कोल्हापुर रोडकडून येण्याकरीता टी जंक्शन मार्गे, इस्लामपुर रोडकडून येण्याकरीता सांगलीवाडी मार्गे, इस्लामपुर रोडकडून येण्याकरीता बायपास रोड मार्गे कॉलेज कॉर्नर, विटा, तासगांवकडून येण्याकरीता संजयनगर मार्गे लव्हली सर्कल / लक्ष्मीमंदीर चौक, पलुस, कुंडलकडून येण्याकरीता बायपास रोड, कॉलेज कॉर्नर.
रॅलीमधील मुख्य मार्गावर (विश्रामबाग चौक ते राममंदीर चौक) कडे येणारे सर्व रस्ते, गल्ली, बोळ या ठिकाणी मोर्चा कालावधीत रस्ता वाहतुकीसाठी बंद असलेली ठिकाणे. पॉईंटचे नांव / लाकडी बैरीकेटींग – नविन ओव्हर ब्रिजचे दोन्ही बाजूस विश्रामबाग चौक ते कुपवाड जाणारे रोडवर, आलदर चौक – मिरजकडून येणारे रस्त्यावर, आदीत्य हॉस्पीटल/ खरे मंगल कार्यालय कॉर्नर, अय्यंगार बेकरी कॉर्नर 100 फुटीकडे जाणारा रस्ता, डॉ. निटवे हॉस्पीटल कॉर्नर – हनुमान हॉटेलकडे जाणारा रस्ता, डॉ. सुधाकर जाधव हॉस्पीटल कॉर्नर – वैष्णवी लॅबकडे जाणारा रस्ता, डॉ. लिमये दवाखाना कॉर्नर, श्री. कुलकर्णी यांचे निवासस्थानाजवळील रस्ता – सर्व्हीस रोडलगत्त, जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला चौक – सह्याद्रीनगरकडून येणारा रस्ता, कृष्णा मॅरेज हॉल प्रवेशद्वारासमोर नविन ब्रिजजवळील कॉर्नर, जुना बाटा शोरुम कॉर्नर / कोकण फिश – गणपती मंदीराकडे जाणारा रस्ता, डॉ. सुभाष पाटील हॉस्पीटल कॉर्नर, टाटा पेट्रोल पंप चौक – नेमिनाथनगरकडे जाणारा रस्ता, चंदू काका सराफ ज्वेलर्स – उद्योग भवनकडून येणारा रस्ता, उद्योग भवन कॉर्नरकडून येणारा रस्ता / टाटा पेट्रोल पंप चौक, हॉटेल देवगिरी कॉर्नर सर्व्हीस रोड – सर्व्हीस रोड, हॉटेल ग्रेट मराठाच्या पश्चिमेकडील रस्ता, मार्केट यार्ड चौक, बापट मळ्याकडे जाणारा रस्ता – बापट मळ्याकडून येणारा रस्ता, मार्केट यार्डात प्रवेश करणारी दोन्ही गेट, देवचंद मेडीकोचे पुर्वेकडील रस्ता, दामाणी हायस्कूलकडे जाणारे रोडवर – सर्व्हीस रोडवर, चांदणी चौकाकडे जाणारा रस्ता, चाटे कोचिंग क्लासेस सर्व्हस रोड, जुने रोहिणी हॉटेल कॉर्नर पुष्पराज चौक, पुष्पराज चौक / काळ्या खणीकडून येणारा रस्ता, हॉटेल नटराज अॅनेक्स कॉर्नर पुष्पराज चौक, डॉ. मोडक हॉस्पीटल कॉर्नर, पुढारी भवन कॉर्नर, प्रेस्टीज कुकर दुकान, पंचमुखी मारुती रोड कॉर्नर, वेलणकर मंगल कार्यालयासमोर काँग्रेस भवन चौकातुन येणारा रस्ता, डॉ. चोपडे हॉस्पीटलचे पाठीमागील बाजूस राममंदीर चौकाकडून येणारा रस्ता, काँगेस भवन चौक – राममंदीर चौकाकडे जाणारा रस्ता, आपटा पोलीस चौकी, वाहन तळ कॉर्नर, सिव्हील हॉस्पीटल चौक.
मोर्चाकरीता येणाऱ्या नागरीकांसाठी पार्कींग व्यवस्था – पार्किंग ठिकाणे
कोल्हापुर कडून येणारे वाहनांसाठी पार्कीग व्यवस्था – अंकली ते कोल्हापुर रोडवर रस्त्याचे कडेला – चार चाकी, आदिसागर मंगल कार्यालय पार्कीग – चार चाकी, कल्पद्रुम क्रिडांगण नेमीनाथनगर – चार चाकी व दुचाकी, कोल्हापुर रोड जुना जकात नाका ते कोल्हापुर रोड शास्त्री चौक रस्त्याचे बाजुस – चाकी चार, दामाणी हायस्कुलचे मैदान.
मिरज कडून येणारे वाहनांसाठी पार्कंग व्यवस्था – समृध्दी आय टी पार्कजवळ वि.बाग रेल्वे स्टेशन – चार चाकी, चिंतामण कॉलेज मैदान – चार चाकी, दुचाकी, विलिंग्डन कॉलेज – चार चाकी / दुचाकी पार्कीग, वालचंद कॉलेज चारचाकी / दुचाकी पार्कीग, कांतीलाल शहा प्रशाला – चारचाकी / दुचाकी पार्कीग, कृषी कॉलेज – दुचाकी पार्कीग, आलदर चौक ते वालचंद कॉलेज चौक रस्त्याचे कडेला दुचाकी पार्कीग.
तासगांव, विटा, कवठेमहंकाळ, जतकडून येणारे वाहनांसाठी पार्कीग व्यवस्था – लक्ष्मी मंदीर ते १०० फुटी जाणारे रोडवर – चिन्मय पार्क दोन्ही बाजूस – चार चाकी पार्कीग, वसंतदादा कुस्ती केंद्र तालीम जवळ – चारचाकी, नव महाराष्ट्र हायस्कूल लक्ष्मीनगर – चारचाकी, पोदार इंटरनॅशनल स्कुलजवळील रस्त्याचे कडेला, सह्याद्रीनगर शाळा नं. 23 जवळील रिकामे मैदान – दुचाकी, उद्योग भवनच्या पश्चिमेकडील रिकाम्या जागेत, कुपवाड फाटा कॉर्नर – चारचाकी, मंगळवार बाजार चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाणारा १०० फुटी रोड – चारचाकी, मार्केट यार्डातील आतील बाजुचे सर्व रस्त्यांवर.
इस्लामपुर, पलुस कुंडलकडुन येणारे वाहनांसाठी पार्कीग व्यवस्था – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम – चार चाकी, छ. शिवाजी महाराज स्टेडीमयजवळ – दुचाकी, तात्यासाहेब मळा – चार चाकी, वखारभाग ते ईदगाह मैदान रस्ता – चार चाकी, सर्कीट हाऊस ते मल्टील्फेक्स जाणारा रस्ता – चार चाकी, वखारभाग आतील गल्ली रस्ते – दुचाकी, चार चाकी, सांगलीवाडी ते जुना सांगलीवाडी टोल नाका रस्त्याचे दोन्ही बाजुस – चार चाकी, चिंचबाग सांगलीवाडी मैदान – चार चाकी, वैरणबाजार – चार चाकी, भावे नाट्यगृहाचे आत – चार चाकी, गणपती पेठ – रस्त्याचे दोन्ही बाजुस कडेला – चार चाकी.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जारी केले आहेत.






































































