Last Updated on 07 Nov 2024 3:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । अभिनेता सलमान खान यांच्यासह आता अभिनेता शाहरूख खान यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिस स्थानकामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे. शाहरुखला धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कॉल ट्रेस केला तेव्हा तो कॉल रायपूरवरून आल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांचं पथक रायपूरला गेलं असून पुढील तपास अद्याप सुरू आहे. मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज आल्याचे वृत्त आहे. हा मेसेज कोणी पाठवला हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. सध्या या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ज्या नंबरवरून फोन कॉल आला होता तो नंबर फैजानच्या नावाने रजिस्टर्ड असल्याचे सांगण्यात येत आहे.







































































