Last Updated on 10 Apr 2025 12:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे. शुक्रवारी, ११ एप्रिल रोजी शिरटे (ता.वाळवा) येथे सकाळी १० वाजता हे अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती मंडळ अधिकारी उषा गवळे यांनी दिली.
तहसीलदार सचिन पाटील यांच्या निर्देशानुसार महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या वतीने शिरटे येथे हे अभियान होत आहे. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार प्रवीण कोटकर हे उपस्थित राहणार आहेत. या अभियानात जातीचे दाखले (कुणबी, रामोशी, वडर, मदारी, नंदीवाले, मांग गारुडी) तसेच जिवंत सातबारा, पाणंद रस्ते, लक्ष्मी मुक्ती योजना, सलोखा योजना व इतर प्रकरणी कामकाजासाठी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी बहे मंडळातील बहे, हुबालवाडी, खरातवाडी, तांबवे, शिरटे, नरसिंहपूर व कोळे येथील ग्रामस्थांनी लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह शिरटे येथे चावडीमध्ये सकाळी १० वाजता उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळ अधिकारी उषा गवळे व ग्राम महसूल अधिकारी बहे अविनाश पाटील यांनी केले आहे.
सरपंच राजेंद्र लाड, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, दिलीप देसाई, शेखर देसाई, रणजीत लाड, अशोक देसाई, बहे ग्राम महसूल अधिकारी अविनाश पाटील, शिरटे ग्राम महसूल अधिकारी सोनाली चव्हाण, कोळे-नरसिंगपूर ग्राम महसूल अधिकारी लहूदास चौधरी, हुबालवाडी ग्राम महसूल अधिकारी शुभांगी चौगुले, तांबवे ग्राम महसूल अधिकारी हेमलता मोरे, मंडळामधील सर्व मंडळातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत.










































































